ओरिएंटल इन्शुरन्सचा टाटा एआयए इन्शुरन्सवर विजय
मुंबई : टाइम्स शील्ड क्रिकेट स्पर्धेच्या एफ डिव्हिजन सामन्यामध्ये ओरिएंटल इन्शुरन्सने टाटा एआयए इन्शुरन्सवर ७ विकेट राखून विजय मिळवला. सोहम चुरीचा अष्टपैलू खेळ त्यांच्या विजयाचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले.
क्रॉस मैदानावर झालेल्या लढतीत सोमवारी टाटा एआयए इन्शुरन्सने प्रथम फलंदाजी करताना ९ बाद २०० धावा केल्या. प्रतिक पुजारीने सर्वाधिक ५७ धावा करताना त्यात मोलाचे योगदान दिले. शार्दुल नाईकने ४३ धावा काढत त्याला चांगली साथ दिली. ओरिएंटल इन्शुरन्सकडून अथर्व कांबळे (2/30), तरुण बोस (2/33) आणि सोहम चुरीने (2/11) प्रभावी गोलंदाजी केली.
प्रतिस्पर्ध्यांचे २०१ धावांचे आव्हान ओरिएंटल इन्शुरन्सने ३ विकेटच्या बदल्यात पार केले. सुमेध निकानीच्या 59 चेंडूत 60 धावा फटकवताना विजयाचा पाया रचला. अमन वर्मा (41 चेंडूत 43 धावा), सोहम चुरी (52 चेंडूत 44*) आणि धीर शाहने (36 चेंडूत 32*) त्याच्याच तोडीसतोड फलंदाजी करताना विजय सुकर केला.