केतन खेडेकर
मुंबई : बौद्धिक विकासाबरोबरच विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास होणेही तितकेच महत्त्वाचे असून शारीरिक विकासासाठी प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या खेळाच्या अंगभूत कौशल्याला तज्ञ मार्गदर्शकांकडून मार्गदर्शन तथा प्रशिक्षण घेणे आज काळाची गरज झाली असून यासाठीच प्रमोद बाबुराव माने यांनी धारावीत महात्मा फुले एज्युकेशन ट्रस्टच्या सहकार्याने सीटी स्पोर्टस अॅकडमीची स्थापना केली असून यामार्फत क्रिकेट, फुटबॉल, बॅडमिंटन, किंक बॉक्सींग, कराटे व हॉकी अशा विविध खेळाच्या प्रशिक्षण वर्गाची गेल्या अनेक वर्षापासून सुरुवात केली असून त्यामार्फत आतापर्यंत सीटी स्पोर्टस् अॅकडमीच्यामार्फत अनेक खेळाडू राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकले असून यापुढेही या प्रशिक्षण वर्गातून विविध खेळासाठी असे खेळाडू तयार करण्याचे शिवधनुष्य माजी आमदार व महात्मा फुले एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष माजी आमदार बाबुराव माने यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमोद बाबुराव माने उचलले आहे.
अशा विविध खेळाच्या प्रशिक्षण वर्गाबरोबर रायफल शुटींग रेंजही अल्पावधीतच या परिसरात सीटी स्पोर्टस अॅकडमी, स्क्वेड्रोन अकॅडमी यांच्या वतीने महात्मा फुले एज्युकेशन ट्रस्टच्या मनोहर जोशी महाविदयालयाच्या सभागृहात उभारण्यात आली. ज्याचे नुकतेच माजी आमदार शबाबुराव माने, संस्थेचे साचिव दिलीप शिंदे, संस्थेचे विश्वस्त श्री. प्रमोद माने, सौ. छाया माने, प्रशिक्षक श्री. योगेश निंबाळकर, प्रिया सिंग, स्क्वेड्रोन अकॅडमीचे शुभम मिश्रा, प्रिती परमार या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत दिमाखात उद्घाटन झाले. यावेळी अनेक प्रतिष्ठित नागरीक, विद्यार्थी व खेळाडू तसेच उपरोक्त संस्थाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
मुंबईतील अनेक खेळाडूनी या रायफल शुटींग रेंजच्या प्रशिक्षण वर्गाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन सीटी स्पोर्टस् अॅकडमीचे प्रमुख प्रमोद बाबुराव माने यांनी केले आहे.