मुंबई : क्रिएटिव्ह आयडियाज अँड इनोव्हेशन्स इन ॲक्शन (CiiA) या स्वयंसेवी संस्थे तर्फे नवउद्योजक-स्टा स्टार्टअप,इतर व्यावसायिकांसाठी वरळी नेहरू सायन्स सेंटर येथे नवोपक्रम प्रदर्शन ५ ते ७  फेब्रुवारी दरम्यान सकाळी १०:३० ते संध्याकाळी ७:०० दरम्यान आयोजित केले आहे.

या प्रदर्शनात स्टार्टअप्स, व्यावसायिक आणि आघाडीच्या अभियांत्रिकी, बायो, फार्मा आणि केमिकल तंत्रज्ञान संस्था आणि विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांचे लक्षवेधी ग्राउंडब्रेकिंग प्रकल्प असणार आहेत.

कृषी, स्वच्छ ऊर्जा, संरक्षण, अंतराळ, इलेक्ट्रॉनिक्स, रोबोटिक्स, एआय गॅझेट्स, हेल्थकेअर सोल्यूशन्स, कचरा व्यवस्थापन आदी क्षेत्रांवर या प्रदर्शनात लक्ष केंद्रित केले आहे.

या प्रदर्शनात प्रदर्शकांशी संवाद-अत्याधुनिक नवकल्पनांचे प्रदर्शन, सेमिनार:नवीनतम तंत्रज्ञानाबद्दल तज्ञांची अंतर्दृष्टी,कार्यशाळा:शिकण्याचे अनुभव,नेटवर्किंगच्या संधी:नवोदितांना भागधारकांशी जोडणे,CiiA इनोव्हेशन अवॉर्ड्स: ट्रॉफी, प्रमाणपत्रे आणि बक्षीस रकमेसह शीर्ष नवकल्पना ओळखणे हे विषय राहणार आहेत.

या प्रदर्शनासाठी प्रवेश विनामूल्य असून प्रवेशासाठी पूर्व नोंदणी www.ciia.co.in या संकेतस्थळावर करता येईल किंवा 9664456303 या मोबाईल वर संपर्क करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *