माथेरान : माथेरान मध्ये माघी गणेशोत्सव उत्साहात आणि आनंदाने साजरा करण्यात आला. १ फेब्रुवायेथील विविध ठिकाणी जवळपास पंचवीस गणेशमूर्तींची यानिमित्ताने प्रतिष्ठापना करण्यात आली होती.माथेरान हे एक छोटेसे गाव असल्याने ग्रामस्थांनी घरोघरी जाऊन बाप्पांच्या दर्शनाचा लाभ घेतला.दि.२ रोजी बाप्पांना ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची आतिषबाजी करून मुले ,मुली महिलांनी बेभान होऊन नाचत निरोप देण्यासाठी मिरवणुकीत भाविकांनी गर्दी केली होती.येथील शारलोट तलावात विसर्जन करण्यात आले.परंतु नेहमीप्रमाणेच बत्ती गुल असल्याने याभागातून बाप्पाना अंधारात मार्गक्रमण करावे लागले.