नवी मुंबई : नवीन मुंबई सानपाडा येथील सेक्टर ८ च्या हुतात्मा बाबू गेनू सैद गणेश मैदानावर गणेश जयंती निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह सानपाडा मंडळाच्या वतीने २६ जानेवारी ते २ फेब्रुवारीच्या दरम्यान अखंड हरिनाम सप्ताह संपन्न झाला, अशी माहिती मारुती विश्वासराव यांनी दिली.
आळंदीचे ह.भ.प. श्री. महादेव महाराज पैठणकर यांचे काल्याचे किर्तन झाले. या अखंड हरिनाम सप्ताहाच्या दरम्यान ह. भ. प. श्री. अनिल महाराज पाटील, ह. भ. प. श्री. चैतन्य महाराज निंबोळे, ह. भ. प. श्री. शंकर महाराज मोरे, ह. भ. प. श्री. ज्ञानेश्वर महाराज कुऱ्हाडे, ह. भ. प. श्री. देवेंद्र महाराज निढाळकर, ह.भ.प. श्री. ज्ञानेश्वर महाराज शिंदे, ह.भ. प. श्री. ज्ञानेश्वर महाराज काकडे, या मान्यवर महाराजांची आध्यात्मिक ज्ञानदानाची किर्तनरुपी सेवा झाली. ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण नेतृत्व ह. भ. प. श्री. बाळू महाराज औटी व ह. भ. प. श्री. मनोहर महाराज लांडे यांनी केले, तर दैनंदिन पूजा व्यवस्था सर्वश्री. रघुनाथ कवडे, ज्ञानेश्वर डोंगरे, शरद घोलप, अशोक घाडगे यांनी केली.
या कार्यक्रमासाठी अनेक भाविकांनी देणगी देऊन सहकार्य केले. भाविकांसाठी महाप्रसादाचा आयोजनबद्ध असा सुंदर कार्यक्रम झाला. अखंड हरिनाम सप्ताह मंडळाच्या वतीने कार्यक्रमाचे सुंदर आयोजन व नियोजन करण्यात आले होते.