नवी मुंबई : सानपाडा सेक्टर ९ मधील मिलेनियम टॉवर बी टाईप सोसायटीतील सुप्रसिद्ध गायक देवदत्त नागपुरे यांच्या मातोश्री सुलोचना नागपुरे यांना २ फेब्रुवारी २०२५ रोजी ९० वर्ष पूर्ण झाली.
त्यानिमित्ताने सानपाडा ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने अध्यक्ष मारुती कदम, उपाध्यक्ष विठ्ठल गव्हाणे खजिनदार विष्णुदास मुखेकर, पोर्ट ट्रस्ट कामगार अंकाचे कार्यकारी संपादक मारुती विश्वासराव, सानपाडा कट्टा परिवाराचे सदस्य सर्वश्री. वाजे, पाटील व गोळे यांनी आईला ९० व्या वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ व मिठाई देऊन शुभेच्छा दिल्या.
