योगासनमध्ये रुपेशला रूपेरी यश

अल्मोरा : आर्टिस्टीक योगासनाच्या एकेरीत महाराष्ट्राच्या रुपेश संगे याने चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करून ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक जिंकले. खरं तर प्रशिक्षकांनी हरकत (प्रोटेस्ट) घेत सुवर्णपदकाचा दावा केला होता. मात्र, पंचांच्या अंतिम निर्णयानंतर रूपेशला रूपेरी यशावरच समाधान मानावे लागले. उत्तरप्रदेशच्या प्रवीण पाठकने ११८.९१ गुणांची कमाई करीत सुवर्ण पदकावर नाव कोरले. रौप्यपदक विजेत्या रुपेशला पंचांनी ११७.८८ गुण दिले. छ्त्तीसगडचा प्रकाश साहू ११७.२५ गुणांसह कांस्यपदकाचा मानकरी ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *