आजवर आपल्याला असे सांगितले गेले आणि आपण त्यावर विश्वास ठेवला ती बाब अशी की आनंद पैशाने विकत घेता येत नाही. तो मिळवावा लागतो आणि त्यासाठी स्वत:चे प्रयत्नही महत्वाचे असतात. केवळ हातात पैसा आहे म्हणून आपण कुणाकडून एखादे काम करवून घेऊ शकतो मात्र या पैशातून आनंद मिळेलच याची खात्री नव्हती. हा विषय एकाच्याच दृष्टीने महत्वाचा असतो कारण पैसा असला तरच आनंद मिळेल अशी आपली अपेक्षा असते मात्र तसे नेहमी होत नाही अनुभव येतो. परंतु असे नसते आणि आनंद पैशाने विकत घेता येतो असे एका संशोधनात समोर आले आहे.
सुप्रसिद्ध अशा हार्वर्ड बिझिनेस स्कूल आणि ब्रिटीश कोलंबिया विद्यापीठाने आपला मनातला हा विषय संशोधनासाठी निवडला आणि त्यासाठी त्यांनी चार पश्चिमी देशांमधील ६०० तरुणांचे सर्वेक्षण आणि अभ्यास केला. यात अमेरिका आणि कॅनडा प्रमुख होते. थोडे अधिक पैसे हातात असले तर जीवनातले समाधान वाढू शकते का? हा प्रश्न होता.
तुम्हाला काही मोकळा वेळ मिळणार असेल तर तुम्ही वस्तू अथवा सेवा यांच्यावर पैसे खर्च कराल का? हा या सर्वेक्षणातील प्रश्नांमध्ये महत्वाचा प्रश्न होता. आणि ज्यांनी असे केले असेल त्यानी अशा आनंदासाठी किती पैसेमोजले हेही सांगायचे होते. आणि इथेच ‘पैशाने आनंद खरेदी करता येत नाही’ या कल्पनेला तडा जातो. कारण या सर्वेक्षणात असे दिसून आले की मोकळा वेळ मिळाल्याने जीवनातील आनद निश्चित वाढतो. आणखी एक प्रश्न असा होता की ‘तुम्हाला एकंदरीत कोणत्या स्तराचे समाधान मिळाले आणि आणि वेळेची किती कमतरता अशा वेळी जाणवली होती? उत्तरे देणारांचे पगार कमी अथवा जास्त असूनही जे उतार मिळाले ते असे की ज्यांनी वेळ वाचवण्यासाठी पैसे खर्च केले होते त्यांना अधिक आनंद मिळालेला दिसला.
या सर्वेक्षणाचा एक निष्कर्ष सांगताना विद्यापीठातील मानसशास्त्राच्या प्राध्यापक एलिझाबेथ डन म्हणाल्या की ‘वेळ खरेदी करण्याचे फायदे केवळ श्रीमंत लोकांसाठीच नसतात. आम्हाला असे वाटले होते की ज्यांचे उत्पन्न साधारण अथवा कमी आहे त्यांनाच अशा खरेदीतून आनद मिळत असावा. परंतु प्रत्यक्षात असे दिसले की उत्पन्नाच्या कोणत्याही स्तरावर पैसे खर्च करण्यातून आनंद मिळत असतो.
आपल्या निष्कर्षांची आणखी तपासणी करण्यासाठी संशोधक चमूने वेगळ्या ६० लोकांना हाताशे घेतले. त्यातील काहींना साप्ताहिक रजेच्या दिवसांमध्ये ‘वेळ वाचेल’ अही खरेदी करण्यासाठी ४० डॉलर्स खर्च करायला सांगितले गेले आणि इतरांना त्यांना वाटेल त्या ‘वस्तू’वर तितकेच पैसे खर्च करायला सांगितले गेले. या प्रयोगात असे दिसले की ज्यांनी आपले स्व-कमाईचे पैसे वेळ वाचवण्यासाठी खर्च केले होते त्याना आपल्या खर्चातून अधिक आनंद मिळाला होता.
या संशोधनातून इतका स्पष्ट निष्कर्ष निघत असला तेरी प्रत्यक्षात मात्र बहुतांश मंडळी वेळ वाचवणाऱ्या खरेदी वर खर्च करीत नाहीत. वेळ खरेदी करण्याची ही पद्धत सध्याच्या घाई गर्दीच्या आणि धकाधकीच्या जगात महत्वाची असली तरी ज्यांना हे शक्य आहे ती मंडळी देखील असे करीत नाहीत ही वस्तुस्थिती दिसते. आनंद अनुभवण्यासाठी तर खरेदी होत असतेच पण वेळ वाचवण्यासाठी केलेल्या खरेदीचा हिशेब केल तर असे दिसले की अशा वस्तू किंवा सेवा केवळ २ टक्के लोकच खरेदी करतात. याचा एक अर्थ असा की लोकाना वेळेची फारशी किंमत नसते. खिशात पैसे असणे त्यांच्या दृष्टीने महत्वाचे…
प्रसन्न फीचर्स