केतन खेडेकर
कस्तुरबा गांधी राष्ट्रसेवा पुरस्काराचे आयोजन नुकतेच एम.डी.काॅलेज, परळ,मुंबई येथे करण्यात आले होते. माजी मुंबई युनिव्हर्सिटी कुलगुरू, खासदार व राष्ट्रीय नियोजन समिती सदस्य सन्माननीय डाॅ. भालचंद्र मुणगेकर , सामाजिक, सहकार, राजकीय व कामगार नेते भाऊ जगताप, शिवाजीराव देशमुख शिक्षण संस्था अध्यक्षा श्रीमती चारुशीलाताई देशमुख आणि विविध क्षेत्रातील मान्यवर व सिने अभीनेत्रीं यांच्या उपस्थितीत पार पडला. सदर कार्यक्रमाचे नियोजन सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय व उतुंग व्यक्तीमत्व सुरज भोईर आणि सहकारी यांनी केले. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन भालचंद्र मुणगेकर यांनी केले तर प्रमुख पाहुणे भाऊ जगताप, चारुशीलाताई देशमुख, सिने अभिनेत्री सुषमा शिनलकर, जयश्री गायकवाड, आरोग्य दूत सुभाषराव गायकवाड होते. मुणगेकर यांनी प.पु. साने गुरुजी यांनी केलेल्या विविध राष्ट्रसेवांची माहिती देवून सभागृहाला मंत्रमुग्ध केले. घरामधील महिलां किती महत्वाचा घटक व आधार स्तंभ असल्याचे आणि त्यामुळे तिचा सन्मान पुरुषांपेक्षा जास्त झाला का झाला पाहिजे हे साने गुरुजींनी दाखवून दिले असे मुणगेकर सरांनी आपल्या भाषणात नमूद केले. आपल्या आयुष्याला जे जे उजाळा, समृद्धी देते, जे जे आयुष्याला पुढे, पुढे नेते त्याला संस्कृती म्हणतात आणि संस्कृती म्हणजे संयम हा कानमंत्र प.पु. साने गुरुजींनी समाजाला दिला. प.पु. साने गुरुजी माझ्या दापोली तालुक्यातील असल्याचा आणि मी तालुक्यात जन्मल्याचा मला अभिमान आहे. समाजसेवक सुरज भोईर यांचे सामाजिक क्षेत्रातील कार्य अनमोल आहे आणि त्यांनी अनेक समाज सेवकांचा मान्यवरांचे हस्ते सन्मान करून त्यांना वर्षानुवर्षे समाजसेवा करण्यासाठी प्रेरणा देण्याचे काम गेली अनेक वर्षे करत आसल्याची माहिती कामगार नेते भाऊ जगताप यांनी दिली. कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरज भोईर यांनी केले. कार्यक्रमात श्री भाऊ जगताप यांच्या सामाजिक, सहकार व कामगार क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल भालचंद्र मुणगेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संपूर्ण महाराष्ट्रात विविध क्षेत्रात निरपेक्ष सेवा करणा-या २५० समाज सेवकांचा उल्लेखनीय कामगिरी बद्दल भालचंद्र मुणगेकर, कामगार नेते भाऊ जगताप आणि विविध मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह व पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.