मुंबई ….सांगली येथील प्रतिष्ठा फाउंडेशनतफे भाईंदर येथील श्री गणेश आख्याड्याचे वस्ताद वसंतराव पाटील यांनी कुस्ती या खेळात दिलेल्या मोठ्या योगदानाबदल २०२५* चा राज्य स्तरीय प्रतिष्ठा   क्रीडारत्न पुरस्कार देऊन नुकतेच गौरविण्यात आले.

समृद्धी मल्टीपर्पज हॉल ,जुना येळावी रस्ता , तालुका तासगांव, जिल्हा-सांगली  येथे झालेल्या एका समारंभात पाटील यांना हा पुरस्कार

प्राध्यापक डॉक्टर माणिकराव साळुंखे नामवंत शिक्षणतज्ञ , प्राध्यापक डॉक्टर रणधीर शिंदे ज्येष्ठ समीक्षक मराठी विभाग शिवाजी विद्यापीठ ,प्रा.डॉ.बाबुराव गुरव ज्येष्ठ साहित्यिक व शिवछत्रपती पुरस्कार विजेते नामवंत पैलवान  नाजरुद्दिन नायकवडी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार देण्यात आला.  मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या सौजन्याने मीरा-भाईंदर कुस्तीगीर संघ संचालित श्री गणेश आखाड्यात  वस्ताद वसंतराव .पाटील तीन दशकांहून जास्त काळ युवा कुस्तीपटू घडवण्याचे मोठे काम करत आहेत. त्यांनी तयार केलेले अनेक कुस्तीपटू  शालेय, विद्यापीठ, जिल्हा , राज्य , राष्ष्टीय  स्पधेत चमक दाखवत आहेत. शहरात कुस्ती प्रशिक्षणा करिता प्रशस्त अशा श्री गणेश आखाड्याची उभारणी करण्यात पाटील यांचे मोठे योगदान होते. हा पुरस्कार मिळाल्याबदल पाटील यांचे श्री गणेश आखाड्या तर्फे व भाईंदर वासियांतर्फे खास  अभिनंदन.करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *