सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ ठाणे व टाटा कॅपिटल लिमिटेड यांच्या सौजन्याने

पाली ः सुधागड तालुकास्तरीय वैयक्तिक क्रीडा स्पर्धा ,सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ ठाणे व टाटा कॅपिटल लिमिटेड यांच्या सौजन्याने पाली येथील ग.बा. वडेर हायस्कूलच्या अरुणकुमार वैद्य मैदानात दिनांक 29 व 30 जानेवारी 2025 रोजी उत्साहात संपन्न झाल्या. स्पर्धांचे उद्धघटन टाटा कॅपिटल लिमिटेड असिस्टंट  उपाध्यक्ष अश्विन नायडू, सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ ठाणे अध्यक्ष  विठ्ठल घाडगे, समन्वयक बळीराम निंबाळकर यांचे हस्ते झाले. प्रमुख उपस्थिती माजी सभापती रमेश साळुंखे, घोडके सर, माजी अध्यक्ष विठ्ठल खेरटकर , उपाध्यक्ष वसंत लहाने  यांची होती.  स्पर्धेमध्ये लांब उडी, उंच उडी, थाळी फेक, गोळा फेक पुलअप्स, 100 मीटर धावणे, 200 मीटर धावणे, 4 द 100 मीटर रिले इत्यादी क्रीडा स्पर्धा दिनांक 29 रोजी मुले व दिनांक 30 रोजी मुली या प्रकारे नियोजन करण्यात आले स्पर्धेत 200 मुले व 150 मुलींनी सहभाग घेतला.  अश्विन नायडू यांच्या हस्ते प्रत्येक शाळेला प्रथमोपचार पेटी व 150 पुस्तकाचा एक सेट(लायब्ररी बुक)  वाचनालयासाठी प्रत्येक शाळेला देण्यांत आला. तसेच त्यांनी काही शाळांना भेट देऊन मागील 8 वर्षामध्ये दिलेल्या साहित्याची पाहणी करून त्याचा वापर शाळा कशी करते याविषयी मुख्याध्यापकांकडे  चर्चा केली. अश्विन नायडू  यांनी आपल्या भाषणांत सांगितले की, तुम्ही 12 वी पास हुशार  गरीब व होतकरू  विद्यार्थ्यांची नांवे आम्हाला द्या त्यांच्या पुढील शिक्षणासाठी सर्व प्रकारची मदत केली जाईल. निंबाळकर यांनी  टाटा कॅपिटल  तर्फे मागील 8 वर्षात दिलेल्या साहित्य व सुविधांची यादी उपस्थितांना सांगून सुधागड तालुक्यातील 14 माध्यमिक शाळेना व गरीब, गरजू विद्यार्थ्यांना त्याचा मोठ्या प्रमाणात उपयोग झाल्याचे सांगून टाटा कॅपिटल कंपनीचे आभार मानले. संस्थचे अध्यक्ष विठ्ठल घाडगे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, संस्थेने विशेषतः पितृछत्र हरपलेल्या, दिव्यांग व गरीब गरजू विद्यार्थ्यांना सर्व प्रकारचे शालेय साहित्य, क्रीडा साहित्य, शैक्षणिक व व्यावसायिक मार्गदर्शन,स्पर्धा परीक्षेसाठी मदत शैक्षणिक व क्रीडा स्पर्धा आयोजन इत्यादी प्रकारे मदत करून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी काम मागील 10 वर्ष नियमित केले आहे व करत आहे. या कार्यासाठी टाटा कॅपिटल सीएसआर मदतीचा हात देत आहे. माननीय  निंबाळकर सर समन्वयक व प्रत्येक शाळेंतील मुख्याध्यापक/ प्रतिनिधी यांचे मोलाचे सहकार्य मिळत आहे मी या सर्वाचा ऋणी आहे.

शैक्षणिक व क्रीडा स्पर्धा आयोजन व सहकार्य यशस्वी कारण्यासाठी  सुजित जगताप सर, मोहन म्हात्रे सर, सुधीर शिंदे सर, काटकर सर,सुनिल तिरमले सर ग. बा. वडेर हायस्कुल, नरेश शेडगे सर, गोळे मॅडम वाघोशी शाळा,  दरेकर सर नाडसुर शाळा,  सुचिर खाडे पाच्छापूर शाळा, मिलिंद शिंदेसर  व विश्वास ढोपे सर जांभुळपाडा व दत्ता दळवी पत्रकार यांनी सहकार्य केले. तसेच सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ ठाणे यांचे सर्व पदाधिकारी व कार्यकारी सदस्य यांचे योगदान लाभले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *