केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कर्ज घेऊन आपल्या मुलांना परदेशात पाठवणाऱ्या पालकांप्रती पूर्ण औदार्य दाखवले आहे. कर्ज घेऊन परदेशात शिकणाऱ्या मुलांच्या महाविद्यालयीन फी भरण्यावर ‌‘टीसीएस‌’ म्हणजेच स्रोतावरील कर कपात रद्द केली आहे. याआधी एका वर्षात कॉलेज फीसाठी 7 लाखांपेक्षा जास्त रक्कम पाठवण्यावर 0.5 टक्के कर आकारला जात होता. कर्ज न घेता परदेशात पैसे पाठवल्यास ‌‘टीसीएस‌’ 20 टक्के कपात करत राहील. ज्यांनी आपल्या मुलांना परदेशात शिकविण्यासाठी कर्ज घेतले आहे, त्यांना दिलासा मिळाला आहे; पण ज्यांनी आयुष्यभराची बचत किंवा मालमत्ता किंवा दागिने विकून आपल्या मुलांना परदेशात पाठवले आहे, त्यांना दिलासा मिळालेला नाही.
फी साठी मदतीची योजना
कॉलेजच्या फीसाठी परदेशात पैसे पाठवल्यास 20 टक्के ‌‘टीसीएस‌’ कापले जातील; मात्र कर्ज न घेता परदेशी कॉलेजांमध्ये फी भरण्याची ‌‘टीसीएस‌’ची मर्यादा वाढवण्यात आली आहे. सरकारने आता त्याची मर्यादा 7 लाख रुपयांवरून 10 लाख रुपये केली आहे. अशा पालकांनाही उत्पन्नाचा विचार करून दिलासा मिळायला हवा, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. कारण यातील अनेक पालक असे आहेत, की जे व्याजाचा बोजा पडू नये, म्हणून कर्ज घेत नाहीत आणि पीएफ वगैरेची रक्कम काढल्यानंतरही ते आपल्या मुलांच्या भविष्यासाठी स्वतःच्या भवितव्याचा त्याग करतात. अशा पालकांची परिस्थिती कर्ज काढून मुलांना परदेशात पाठवणाऱ्या पालकांपेक्षाही वाईट होते.
मध्यमवर्गीय पालकांची स्वप्ने होतील पूर्ण
अर्थमंत्र्यांचे हे पाऊल विदेशात उच्च शिक्षणाला चालना देऊन विकसित भारताच्या इराद्याला पुष्टी देणारे आहे. यामुळे मध्यमवर्गीय पालकांची स्वप्नेही पूर्ण होतील. ज्यांना आपल्या मुलांना शिक्षणासाठी परदेशात पाठवून त्यांचे चांगले भविष्य सुनिश्चित करायचे आहे, अशी स्वप्ने पाहणाऱ्या पालकांची संख्याही वाढेल.
पशुकिसान क्रेडिट काडामुळे दुग्धव्यवसायाला चालना
नवी दिल्लीः भारत सरकारने पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पशु किसान क्रेडिट कार्ड सुरू केले आहे. या कार्डच्या माध्यमातून पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांचा व्यवसाय करण्याची सोय होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे. या कार्डच्या मदतीने पशुपालनासोबतच मत्स्यपालन करणाऱ्या शेतकऱ्यांनाही आर्थिक मदत मिळू शकते. यापूर्वी या कार्डवर तीन लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध होते; मात्र ते आता पाच लाख रुपये करण्यात आले आहे.
पशु किसान क्रेडिट कार्डची वैशिष्ट्ये
पशुपालन करणारे शेतकरी या कार्डद्वारे 5 लाख रुपयांचे कर्ज घेऊ शकतात. या कार्डच्या मदतीने म्हशीसाठी 60,249 रुपये तर प्रती गाय 40,783 रुपये, प्रति कोंबडी 720 रुपये आणि मेंढी किंवा शेळीसाठी 4063 रुपये कर्ज उपलब्ध आहे. या कार्डवर 1.6 लाख रुपयांच्या कर्जासाठी कोणतीही हमी आवश्यक नाही. वित्तीय संस्था किंवा बँका 7 टक्के दराने कर्ज देतात, तर पशुपालनाशी संबंधित शेतकऱ्यांना 4 टक्के दराने कर्ज दिले जाते. पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जाची रक्कम आणि व्याज 5 वर्षात फेडायचे आहे. कर्जाची रक्कम पशुपालकांना सहा समान हप्त्यांमध्ये दिली जाते. केंद्र सरकारकडून कर्जावर 3 टक्के सूट दिली जाते. अशा प्रकारे एकूण कर्जाचे व्याज 4 टक्के राहते.
पशु किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज करायचा असेल, तर सर्वप्रथम बँकेत जाऊन अर्ज मागवावा लागेल. हा फॉर्म भरण्यासोबतच काही केवायसी कागदपत्रे जमा करावी लागतील. संपूर्ण माहितीने भरलेला अर्ज. जमिनीचा कागद. प्राणी आरोग्य पेपर, पासपोर्ट आकाराचा फोटो, आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, बँक खाते आदी कागदपत्रांची गरज लागते.

पशु किसान क्रेडिट कार्डसाठी कोणते व्यवसाय पात्र?
*मत्स्यपालन
मत्स्यपालन करणारे शेतकरी ज्यांच्याकडे टाक्या, तलाव, रेसवे, ओपन वॉटर एरिया आणि हॅचरी आहेत. शेतकऱ्यांकडे मत्स्यपालन आणि संबंधित कामासाठी परवाना असणे आवश्यक आहे. यामध्ये बचत गट, मत्स्यपालन, महिला गट आदी कार्ड बनविण्यास पात्र आहेत. सागरी मत्स्यव्यवसायअर्जदाराकडे मासेमारी जहाज, नोंदणीकृत बोट, मासेमारी परवाना, समुद्रातील मासेमारीचा परवाना, मत्स्यपालन आणि संबंधित काम असणे आवश्यक आहे. यासाठी बचत गट, मत्स्यशेतक जसे की व्यक्ती, भागीदार, गट, भागपीक आणि भागपीक पात्र आहेत. याशिवाय महिला गटही पात्र आहेत.

*कुक्कुटपालन
यामध्ये शेळ्या, मेंढ्या, कुक्कुटपालन, डुक्कर व पक्षी पालन करणारे शेतकरी, कुक्कुटपालन करणारे शेतकरी, संयुक्त दायित्व गट आणि बचत गट पात्र आहेत.

* दुग्धव्यवसाय
यामध्ये शेतकरी, दुग्ध उत्पादक शेतकरी, संयुक्त दायित्व गट आणि बचत गटदेखील पात्र आहेत.??

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *