Month: February 2025

38वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, उत्तराखंड 2024-25

स्क्वॅशमध्ये डबल धमाका, महिलांना सुवर्ण, पुरूष संघाला रौप्य सेमवाल बहिणभावाच्या जोडीचा पदकाचा करिश्मा डेहराडून ः  महाराष्ट्राच्या महिला संघाने स्क्वॅशमध्ये प्रथमच सुवर्ण पदक जिंकून 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा सहावा दिवस गाजविला. अंतिम लढतीत अनिका दुबे हीनेे जखमी असतानाही झुंज देत सुवर्णपदक खेचून आणले. पुरूष संघाने रूपेरी यश संपादन करून स्क्वॅशमध्ये डबल धमाका घडविला. या स्पर्धेत अंजली व ओम सेमवाल या बहिणभावाच्या जोडीने पदकाचा करिश्मा घडविला आहे. राजीव गांधी स्टेडियममध्ये सुरू असलेल्या स्क्वॅशमधील अंतिम लढतीत महाराष्ट्राच्या महिलांनी पहिली लढत गमावल्यानंतर तामिळनाडूवर 2-1 अशी…

३८वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, उत्तराखंड २०२४-२५

वॉटरपोलोत महाराष्ट्राचे दोन्ही संघ उपांत्य फेरीत हल्दवानी : महाराष्ट्राच्या महिला व पुरुष या दोन्ही वॉटरपोलो संघांनी ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक दिली. महिलांना विजयासाठी चांगलेच झगडावे लागले, पण पुरुषांनी सहज विजय मिळवित आगेकूच केली. इंदिरा गांधी स्टेडियमची जलतरण तलावावर ही स्पर्धा सुरू आहे. महिला गटात महाराष्ट्र व पश्चिम बंगाल यांच्यात अतियश रंगतदार लढत झाली. कधी महाराष्ट्राकडे, तर कधी बंगालकडे  आघाडी असायची मात्र, ७-७ अशा बरोबरीनंतर महाराष्ट्राने लागोपाठ २ गोल करत आघाडी घेतली. मग ही आघाडी टिकवत महाराष्ट्राच्या महिलांनी ९-७ गोल फरकाने बाजी मारली. सर्वाधिक ५ गोल करणारी मुंबईची तन्वी मुळे या विजयाची शिल्पकार ठरली. राजश्री गुगळे (२गोल), याना अग्रवाल (१), पुजा कुमरे (१) यांनीही विजयात आपला वाटा उचलला. पुरुष गटात महाराष्ट्राने केरळचा १०-३ गोल फरकाने धुव्वा उडविला. महाराष्ट्राकडून अश्विनकुमार कुंडे व सारंग वैद्य यांनी २-२ गोल केले, तर भूषण पाटील, श्रेयस वैद्य, ऋतुराज बिडकर, अक्षयकुमार कुंडे, पीयूष सुर्यवंशी, पार्थ अंबुलकर यांनी प्रत्येकी एक गोल केला. महिला संघाला विलास देशमुख व योगेश निर्मल यांचे, तर पुरुष संघाला रणजित श्रोत्रीय व उमेश उत्तेकर यांचे मार्गदर्शन लाभले.

38वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, उत्तराखंड 2024-25

राही सरनोबतचे सोनेरी पुनरागमन पिस्तुलात बिघाड होऊनही 25 मीटरमध्ये मारली बाजी डेहराडून ः  आजारपणामुळे जवळजवळ दोन वर्षे स्पर्धात्मक नेमबाजीपासून दूर असलेली कोल्हापूरची सुवर्णकन्या राही सरनोबतने 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील सोनेरी…

३८वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा

धिर्ती अहिरवालला जलतरणात सुवर्णपदक हलदवानी : पालघरच्या धीर्ती अहिरवाल हिने ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील जलतरणच्या २०० मिटर बटरफ्लाय प्रकारात महाराष्ट्राला सुवर्णपदक जिंकून देण्याचा पराक्रम केला. धिर्तिने २ मिनिटे २३.८० सेकंद वेळेसह सुवर्ण पदकावर मोहोर उमटवली. कर्नाटकची सुहासिनी घोष व आसामची अस्था चौधरी यांना अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक मिळाले. रीलेमध्ये रौप्य व कांस्य! जलतरणातील महिलांच्या ४ बाय २०० मिटर फ्री स्टाईल प्रकारात महाराष्ट्राला रौप्य पदक मिळाले, तर पुरुषांच्या ४ बाय २०० मिटर फ्री स्टाईल प्रकारात महाराष्ट्राला कांस्यपदक मिळाले. महिला गटात अन्वी देशवाल, सान्वी देशवाल, धिर्ति अहिरवाल व अदिती हेगडे या चौकडीने ९ मिनिटे ९.३७ सेकंद वेळेसह रूपेरी यशाला मिठी मारली. कर्नाटक संघाने सुवर्णपदक पटकाविले, तमिळनाडूला कांस्यपदक मिळाले. पुरुष गटात शुभम धायगुडे, ओम साटम, ऋषी भगत व ऋषभ दास या चौघांनी ७ मिनिटे ५५.६२ सेकंद वेळेसह कांस्यपदकाची कमाई केली.  कर्नाटक व गुजरात संघाने अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदक पटकाविले.

38वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, उत्तराखंड 2024-25

राष्ट्रीय विक्रमासह वैष्णव ठाकूरची रूपेरी कामगिरी डेहराडून :  महाराष्ट्राच्या वैष्णव ठाकूर या २३ वर्षीय खेळाडूने 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या वेटलिफ्टिंगमध्ये राष्ट्रीय विक्रम नोंदवित रुपेरी कामगिरी केली राजगुरुनगर तालुक्यातील ठाकूर पिंपरी या गावचा खेळाडू वैष्णव याने पुरुषांच्या १०२ किलो वजनी गटातील स्नॅचमध्ये १६० किलो वजन उचलले आणि गत वेळी जगदीश विश्वकर्मा याने नोंदविलेला १५७ किलोचा विक्रम मोडला. स्नॅचमध्ये वैष्णवने आघाडी घेतली होती. मात्र, क्लीन व जर्कमध्ये त्याला १७५ किलो उचलता आले. एकूण त्याने ३३५ किलो वजन उचलून रौप्यपदक जिंकले. विश्वकर्मा याने येथे स्नॅचमध्ये १५२ किलो तर क्लीन व जर्कमध्ये १९३ किलो असे एकूण ३४५ किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकाविले. वैष्णव हा वडगाव मावळ येथे ज्येष्ठ प्रशिक्षक अनिकेत नवघणे यांच्या मार्गदर्शनाखाली गेली पाच वर्षे प्रशिक्षण घेत आहे‌. गतवर्षी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या अगोदर गुडघ्याची शीर तुटल्यामुळे त्याला स्पर्धेत भाग घेता आला नव्हता. त्यानंतर गेले तीन महिने त्याने या स्पर्धेसाठी खूप मेहनत घेतली होती. आजपर्यंत त्याने वरिष्ठ व कनिष्ठ या दोन्ही गटात मिळून चार सुवर्णपदकांसह सात पदके जिंकली आहेत. नुकत्याच झालेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेतही त्याने सोनेरी कामगिरी केली होती. त्याचे वडील शेतकरी असून, वैष्णव हा राजगुरुनगर येथील हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात कला शाखेत शिकत आहे.

38वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, उत्तराखंड 2024-25

कबड्डीत महाराष्ट्राला कांस्यपदक हरिव्दार ः राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महिलांच्या कबड्डीमध्ये महाराष्ट्राला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. उपांत्य फेरीत महाराष्ट्राला हरियाणाकडून 24-39 गुणांनी पराभव पत्करावा लागला. हरिव्दारमधील योगस्थळी क्रीडा परिसरात संपलेल्या कबड्डी स्पर्धेतील उपांत्य फेरीत हरियाणाने महाराष्ट्रावर मात केली. उपांत्यपूर्व फेरीत पश्चिम बंगाल हरवून महाराष्ट्राने उपांत्य फेरी गाठली होती. उपांत्य फेरीत महाराष्ट्राची बलाढ्य  हरियाणा संघाशी झुंज रंगली. पूर्वार्धात 21-13 गुणांनी आघाडी घेत उत्तरार्धातही हरियाणाने आपली हुकुमत कायम राखून महाराष्ट्राला पराभूत केले. बचावात्मक खेळ केल्याने महाराष्ट्राला पराभूत व्हावे लागले. उपांत्य लढतीमधील पराभूत संघांना कांस्यपदक बहाल करण्यात येते. महाराष्ट्रासह राजस्थान संघ कांस्य पदकाचा मानकरी ठरला.

विहंग, सरस्वती, महात्मा गांधी व ग्रिफिन जिमखाना उपांत्य फेरीत

श्री मावळी मंडळ संस्थेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त प्रथम विभागीय पुरुष व महिला गटाच्या खो-खो स्पर्धेत पुरुषांच्या उपांत्य गटात विहंग क्रीडा केंद्र (ठाणे), शिर्सेकर्ल महात्मा गांधी स्पोर्ट्स अकॅडेमी  (मुंबई उपनगर), सरस्वती…