Month: February 2025

डायलिसीस सुविधा देणारे हे रायगड जिल्हयातील सर्वात मोठे केंद्र – आदिती तटकरे

अशोक गायकवाड रायगड : डायलिसीस सुविधा देणारे हे रायगड जिल्हयातील सर्वात मोठे केंद्र आहे. अशा प्रकारे जिल्हयात ३२ केंद्र मंजुर करण्यात आले आहेत.संपुर्ण राज्यात शासनाने ४०० डायलिसिस केंद्रांना मंजुरी दिली आसून त्यामधे रोज ३००० रुग्णांना सेवा दिली जाणार आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. सार्वजनिक आरोग्य कुटुंब कल्याण विभाग अंतर्गत जिल्हा शल्य चिकित्सक रायगड अलिबाग आणि एच.एल.एल.लाईफ केअर लि.यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण रूग्णालय म्हसळा येथे सुरु करण्यात आलेल्या डायलिसिस सेंटरचे लोकार्पण महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. या डायलिसिस सेंटरच्या माध्यमातून रुग्णांना मोफत सेवा देण्यात येणार असल्याची घोषणा तटकरे यांनी यावेळी केली. या कार्यक्रमाला वैद्यकीय अधीक्षक डॉ प्रफुल्ल पावसेकर, उप जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किरण शिंदे, मुख्याधिकारी विठ्ठल राठोड, स.पो.निरिक्षक संदीप कहाळे, सा.बांधकाम अभियंता महाजन आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलतांना तटकरे म्हणाल्या, म्हसळा या ग्रामीण रुग्णालयात स्वतंत्र कक्षात ५ डायलिसिस मशीन व बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. दरदिवसाला १५ डायलिसिस रूग्णांना सेवा दिली जाणार आहे. डायलिसीस सुविधा देणारे हे रायगड जिल्हयातील सर्वात मोठे केंद्र आहे. अशा प्रकारे जिल्हयात ३२ केंद्र मंजुर करण्यात आले आहेत. संपुर्ण राज्यात शासनाने ४०० डायलिसिस केंद्रांना मंजुरी दिली आसून त्यामधे रोज ३००० रुग्णांना सेवा दिली जाणार आहे. श्रीवर्धन मतदार संघात श्रीवर्धन येथे २,माणगाव २, आणि रोहा येथे ३ मशीन ऊपलब्ध आहेत. जास्तीत जास्त रुग्णांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन कु. तटकरे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैद्यकीय अधीक्षक डॉ प्रफुल्ल पावसेकर यांनी केले.यावेळी नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

आज युवा कार्य प्रशिक्षणार्थी युवक- युवतींचा पुन्हा एकदा एल्गार

ठाणे : महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी जाहीर केल्याप्रमाणे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी ज्या अस्थापानेत कार्यरत आहेत, तिथेच त्यांना नियमित करण्यात येईल असे आश्वासन दिले…

श्री उद्यानगणेश कॅरम स्पर्धेत विश्वेत, निखील, सोहम, केतकीची विजयीदौड

मुंबई : श्री उद्यानगणेश मंदिर सेवा समिती मुंबई व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित श्री उद्यानगणेश मंदिर चषक विनाशुल्क कॅरम स्पर्धेत हिरानंदानी फाउंडेशन स्कूल-ठाणेचा विश्वेत बिजोतकर, सीईएस मायकल…

सुप्रसिद्ध गायक देवदत्त नागपुरे यांच्या मातोश्री सुलोचना नागपुरे यांना ९० वर्ष पूर्ण

नवी मुंबई : सानपाडा सेक्टर ९ मधील मिलेनियम टॉवर बी टाईप सोसायटीतील सुप्रसिद्ध गायक देवदत्त नागपुरे यांच्या मातोश्री सुलोचना नागपुरे यांना २ फेब्रुवारी २०२५ रोजी ९० वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्ताने…

नावीन्यपूर्ण कृषिकडे वळताना कृषी परिसंस्था बदलू नका-डॉ. संजय भावे

अशोक गायकवाड कर्जत : नावीन्यपूर्ण कृषिकडे वळताना कृषी परिसंस्था बदलू नका, त्यामुळे सामाजिक समस्या निर्माण होतात.सोयाबीन, बी. टी.कापसाचे उत्पादन ज्या भागात होते त्याठिकाणी शेतकरी आत्महत्यासारख्या समस्या उद्भवल्या मात्र कोकणातील भात…

38वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, उत्तराखंड 2024-25

वॉटरपोलोत महाराष्ट्राचे दोन्ही संघ अंतिम फेरीत सुवर्णपदकासाठी महिलांत केरळ, तर पुरुषांत सेनादलाचे आव्हान हल्दवानी : महाराष्ट्राच्या पुरुष व महिला संघांनी वोट्रपोलोमधील आपली विजयी घोडदौड कायम राखत ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या…

38वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, उत्तराखंड 2024-25

तिरंदाजीत महाराष्ट्राला सुवर्ण चौकाराची संधी! सबज्युनिअर खेळाडूंची चमकदार कामगिरी डेहराडून ः राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील तिरंदाजीत महाराष्ट्राच्या महिला संघांनी अचूक वेध साधला. रिकर्व्ह व कंपाऊंड या दोन्ही प्रकारातील सांघिक गटासह रिकर्व्ह…

महिलांच्या इलिट स्प्रिंट टू लॅपस् प्रकारात सोनेरी यश

ट्रॅक सायकलिंगमध्ये पुण्याच्या श्वेता गुजाळला सुवर्ण रुद्रपूर : जेतेपदाची प्रबळ दावेदार असलेल्या महाराष्ट्राच्या श्वेता गुजाळ हिने ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महिलांच्या ट्रॅक सायकलिंगमध्ये इलिट स्प्रिंट टू लॅपस् प्रकारात सुवर्णपदक जिंकून…

38वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, उत्तराखंड 2024-25

स्क्वॉशमध्ये महाराष्ट्राला दोन रौप्य व एक कांस्य डेहराडून ः राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत राहुल बैठा व अंजली सेमवाल यांना रौप्य, तर सूरज चंदने कांस्यपदक जिंकून महाराष्ट्राला स्क्वॉशमध्ये सर्वसाधारण उपविजेतेपद मिळवून दिले.…

३८वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा

योगासनमध्ये रुपेशला रूपेरी यश अल्मोरा : आर्टिस्टीक योगासनाच्या एकेरीत महाराष्ट्राच्या रुपेश संगे याने चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करून ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक जिंकले. खरं तर प्रशिक्षकांनी हरकत (प्रोटेस्ट) घेत सुवर्णपदकाचा…