राष्ट्रवादीत २ बाद ७ नाराज !

धनंजय मुंडे थेट दिल्लीत

अमित शाहांच्या भेटीनं राष्ट्रवादीत खळबळ

स्वाती घोसाळकर

नवी दिल्ली : बीडमधिल सरपंच देशमुख यांच्या हत्येनंतर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या धनंजय मुंडें यांनी राजीनामा दिला होता. आज माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्यामुळे आता राजीनामा देणाऱ्यांची संख्या २ झाली आहे. तर उर्वरीत ७ मंत्रीही विविध कारणांनी नाराज असल्याने नेमके राष्ट्रवादीत चाललय काय असा सवाल राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे.

मंत्रिमंडळात छगन भुजबळ यांना वगळल्यानंतर भुजबळांनी थेट अमित शाहांना साकडे घालून मंत्रीपदी वर्णी लावली होती. या पार्श्वभुमीवर धनंजय मुंढेही आपली वर्णी मंत्री मंडळात लावणार का अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनी पक्षातील हायकमांडला अंधारात ठेवून आज दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याने या चर्चेला पृष्ठी मिळाली आहे.

 माणिकराव कोकाटे यांच्या जागी धनंजय मुंडे यांची मंत्रीमंडळात वर्णी लागणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. जवळपास एक तास धनंजय मुंडे हे संसद भवनात होते. ११ वाजता ते संसद भवनात आले होते. त्यानंतर त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे हे दिल्लीत आहेत. त्यामुळं धनंजय मुंडे यांचा दिल्ली दौरा महत्वाचा मानला जात आहे.

धनंजय मुंडेंचे हायकमांड

महाराष्ट्रात- सुनील तटकरे

धनंजय मुंडे दिल्लीत का आले हे आपल्याला माहीत नाही. त्यांनी याबाबत पक्षाला काहीही कळवलेले नाही. ते अमित शाहांना का भेटले याची आपणास कल्पना नाही. त्यांच्याशी बोलणे झाल्यावर आपण त्यांना याबाबत विचारू, बाकी मंत्रीपदासाठी ही भेट झाली यात काही तथ्य नाही. धनंजय मुंडे यांचे हायकमांड महाराष्ट्रात आहे अशा शब्दात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी घटनेवर सुचक इशारा दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *