रमेश औताडे

मुंबई : बांगलादेशमध्ये अल्पसंख्यांक हिंदूंवर सुरू असलेल्या अत्याचारांविरोधात विश्व हिंदू परिषदेने मुंबईसह भारतभर आज तीव्र निदर्शने केली.

देशातील विविध शहरांमध्ये, विशेषतः मुंबईसारख्या महानगरांमध्ये, बांगलादेशमधील हिंदूंवर होणाऱ्या हत्याकांड, धार्मिक अत्याचार आणि इतर मानवाधिकार उल्लंघनांविरुद्ध लोक रस्त्यावर उतरले.

निदर्शकांनी बांगलादेश सरकारच्या धोरणांविरुद्ध आवाज उठवला असून, धार्मिक स्वातंत्र्य, समानता आणि मूलभूत मानवी हक्कांची मागणी केली. या विरोधसभांमध्ये विविध सामाजिक, धार्मिक व नागरी संघटनांनी सहभाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *