महाराष्ट्राच्या भल्यासाठी ‘शिवराज’युती;

ठाकरेंच्या युतीसाठी ‘मनसे’ आणाभाका !

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची युतीची घोषणा

दोन्ही ठाकरेंच्या कुटुंबियांची उपस्थिती

मुंबईत महापौर मराठीच होणार आणि आमचाच होणार

 उद्धव ठाकरेंच्या साक्षीने राज ठाकरेंची ‘मनसे’ गर्जना
मुंबई : कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे आणि म्हणूनच महाराष्ट्राच्या भल्यासाठी आम्ही आज एकत्रित येऊन महानगरपालिकेच्या निवडणूका लढवित आहोत अशा युतीच्या आणाभाका शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरेंनी घेतल्या. शिवसेना आणि राज ठाकरेंची अनोखी ‘शिवराज’ युती आज अवघ्या महाराष्ट्राने पाहिली. महाराष्ट्राच्या राजकारणात दिर्घकालीन परिणाम करणारी ही युती आज देशभर चर्चेत राहीली. विशेष म्हणजे ही युती व्हावी यासाठी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या प्रचंड मेहनतीसाठी राज ठाकरेंनी संजय राऊतांना खास स्टेजवर बोलावून दोन्ही ठाकरे बंधूंच्या मध्ये उभे करत फोटो पोझ दिली. ही युती मनसे झाली असल्याने आतापासून आकड्यांचा खेळ करू नका असा भावनिक दमही राज ठाकरेंनी प्रसार माध्यामांना दिला.

आज मुंबईसाठी शिवसेना आणि मनसे युती झाल्याचे मी जाहीर करत आहोत, अशी घोषणा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित अशी राज आणि उद्धव यांची संयुक्त पत्रकार परिषद आज वरळीतीर ब्ल्यू आय हॉटेलमध्ये पार पडली. मात्र, मुंबईमध्ये कोण किती जागा लढवणार हे आम्ही आता सांगणार नाही, असे सांगत भाजपला प्रत्यक्ष टोला लगावला. महाराष्ट्रामध्ये सध्या लहान मुलं पळवण्याची खूप टोळ्या फिरत आहेत. त्यामध्ये दोन टोळ्या अजून सहभागी झाल्या आहेत ते राजकीय पक्षांमधली मुलं पळवतात, असा टोलाही राज यांनी लगावला. राज ठाकरेंचा रोख भाजपा आणि एकनाथ शिंदेंकडे होता.

  मुंबईमध्ये मराठी आणि आमचाच महापौर होणार असा विश्वास राज यांनी व्यक्त केला. बाकी जे बोलायचं ते आम्ही जाहीर सभांमधूनच बोलू, माझ्याकडे सुद्धा खूप व्हिडिओ असल्याचे सांगत त्यांनी अप्रत्यक्षरित्या भाजपला सुद्धा इशारा दिला.

उद्धव ठाकरे म्हणाले कीआज आम्ही आमचं कर्तव्य म्हणून एकत्र आलो आहोत आणि मी मागेच म्हटलं एकत्र आलो आहोत ते एकत्र राहण्यासाठी. प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे आणि राजचे वडिल श्रीकांत ठाकरे यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईत दिलेल्या योगदानाची आठवण देत उद्धव ठाकरेंनी, यापुढे मुंबईवरती आणि महाराष्ट्रवर कोणी वाकड्या नजरेने किंवा त्यांच्या कपटी कारस्थानाने महाराष्ट्राला मुंबईपासून किंवा मुंबईला महाराष्ट्रपासून मराठी माणसापासून तोडण्याचा प्रयत्न करेल त्याचा राजकारणात खात्मा केल्याशिवाय राहणार नाही शपथ घेऊन आम्ही मैदानात उतरलो आहोतअसा इशाराच भाजप आणि शिंदेंच्या सेनेला दिला. उत्साह अमाप आहेमी तुमच्या सर्वांच्या माध्यमातून मला कल्पना आहे की आज केवळ महाराष्ट्र विनंती करतोयआवाहन करतो आणि एक सूचना सुरात करतोयकारण मागे विधानसभेच्या वेळेला भारतीय जनता पक्षाचे जो एक अपप्रचार केला होता बटेंगे तो कटेंगे तसं आज मी मराठी माणसाला सांगतोय कीआता जर का चुकाल तर संपालआता जर का फुटाल तर पूर्णपणे संपून जाईलम्हणून परत एकदा तुटू नकाफुटू नका आणि मराठीचा वसा टाकू नकाहाच एक संदेश मी आमच्या दोघांच्या युतीच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्र देतो आहे आणि मला खात्री आहे. मराठी माणूस कोणाच्या नादी लागत नाही आणि कोणी त्याच्या वाटेला कोणी आला तर त्याला परत जाऊ देत नाही असं म्हणून एक प्रकारे उध्दव ठाकरेंनी इशाराच दिला आहे.

कोणत्याही वादापेक्षा

महाराष्ट्र मोठा आहे…

राज ठाकरे

आज २४ डिसेंबर २०२५ रोजी, मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना, या दोन पक्षांची आगामी महापालिका निवडणुकांसाठीची युती घोषित झाली. महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष म्हणून मी आणि शिवसेना पक्षप्रमुख म्हणून श्री. उद्धव ठाकरे अशी आम्ही दोघांनी या युतीची अधिकृत घोषणा संयुक्त पत्रकार परिषदेत केली.

ही युती बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित होती. आणि या सगळ्याची सुरुवात, मी एका मुलाखतीत दिलेल्या वाक्यातून झाली.

कुठल्याही वादापेक्षा आणि भांडणांपेक्षा आपला महाराष्ट्र आणि मराठी माणूस मोठा आहे.’ हे माझं वाक्य होतं. हे निव्वळ मुलाखतीतलं वाक्य नाहीये, तर ही तीव्र भावना आहे.

आणि यातूनच हे २ पक्ष एकत्र आले आहेत. बाकी युतीची घोषणा झाली. आता कोणाला कुठल्या आणि किती जागा मिळणार याची उत्तरं लवकरच मिळतील.

त्यावर आजच्या व्यासपीठावर कुठलीही माहिती सांगितली नाही, कारण त्या तांत्रिक बाबी आहेत.

युती ही किती जागा, कुठल्या जागा यासाठी नाहीये. ती आज मराठी माणसाचं मुंबई आणि परिसर पण उद्या राज्याच्या इतर भागातून अस्तित्व मिटवण्याचा जो प्रयत्न सुरु आहे, त्या शक्तींना गाडून टाकण्यासाठीची ही युती आहे.

त्यामुळे जागावाटप आणि त्याचा तपशील योग्य वेळी संबंधित व्यक्ती घोषित करतील.

मुंबईचा महापौर हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेचा असेल आणि तो निर्विवादपणे मराठीच असेल.

आज वर्तमानपत्रं असोत किंवा वृत्तवाहिन्या, त्यांचे बहुसंख्य संपादक, पत्रकार आणि तिथे काम करणारी इतर मंडळी ही कडवट मराठी प्रेमी आहेत. आणि त्यांना मराठी भाषेच्या विरोधात आणि मराठी माणसाच्या विरोधात जे षडयंत्र सुरु आहे ते आवडत नाहीये. त्यातले अनेक जणं त्यांचा रोष त्यांच्या पत्रकारितेतून व्यक्त करतात, तर काही खाजगीत व्यक्त होतात.

माझी सगळ्यांना विनंती आहे की यावेळेस तुमच्या मालकांना आणि त्यांच्या मालकांना काय वाटतं यापेक्षा तुमच्या सद्सद्विवेक बुद्धीला काय वाटतं, पटतं तेच मांडा, बोला. ही दोन पक्षांची लढाई नाही तर ही मराठी माणसाची लढाई आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या वेळेस जशी तत्कालीन माध्यमं मराठी माणसाच्या पाठीशी उभी राहिली तसं यावेळेस तुम्ही उभे रहा. कारण मराठी भाषा आणि मराठी माणूस टिकला तर तुमचं अस्तित्व टिकेल.

सभांच्या वेळेस मराठी बांधव-भगिनींच्या दर्शनाचा योग येईलच. तोपर्यंत सर्वांना सस्नेह जय महाराष्ट्र !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *