कल्याण : जीवनदीप महाविद्यालयाच्या कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन समारंभ बुधवारी पार पडला. शैक्षणिक वर्षात उत्कृष्ट कामगिरी करणारे गुणवंत विद्यार्थी विविध क्षेत्रातील मान्यवर पाहुणे कला, क्रीडा, पर्यावरण क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार जीवनदीप महाविद्यालय गोवेली येथे पार पडला.
या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित टिटवाळा पोलीस निरीक्षक पंकज गिरी, हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन आरोग्य विभाग वरिष्ठ व्यवस्थापक डॉ. प्रफुल्ल विशे, भाजपा युवा नेता दिनेश कथोरे, सुप्रसिद्ध मुरबाडी बाई प्राची पाटील, बॉलीवूड स्टंट डायरेक्टर चिता शेट्टी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. आशा मुंजाळ, आदर्श शेतकरी सुरेश गायकर, डॉ. प्रतीक्षा घोडविंडे आदी मान्यवर या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष. रविंद्र घोडविंदे यांनी मान्यवरांचा सन्मान केला.
महाविद्यालयाचे कला, क्रीडा, शैक्षणिक क्षेत्रात अव्वल आलेले अशा सर्व विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व पदक देऊन सन्मान करण्यात आला. मान्यवरांनी विद्यार्थ्यांना खूप मोलाचे मार्गदर्शन केले यामध्ये आपण आपलं भवितव्य कशाप्रकारे घडवावं, पर्यावरणाला कसे जोपासावे इत्यादी विषयांवर मान्यवरांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. कार्यक्रमाचे आकर्षण असलेली सुप्रसिद्ध मुरबाडी बाई प्राची पाटील यांनी आपल्या गोड मुरबाडी बोलीने प्रेक्षकांना खिळवून ठेवलं. यानंतर सर्व विद्यार्थ्यांच्या आवडत्या सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यामध्ये नृत्य, मोनो ऍक्ट व विविध रिमिक्स मराठी, हिंदी गाण्यांवर नृत्य करत विद्यार्थ्यांनी आपली कलाकारी सादर केली.
संस्थेचे संचालक. प्रशांत घोडविंदे, प्राचार्य. डॉ.अशोक वाघ, उपप्राचार्य. हरेंद्र सोष्टे, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य. प्रकाश रोहणे व प्राध्यापक वर्ग उपस्थित होते. सूत्रसंचालन सांस्कृतिक विभागप्रमुख. सतीश लकडे, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. नरेश टेंभे, प्रा. दिनेश धनगर, प्रा. जया देशमुख यांनी केले.
००००००००
