दुरांतो एक्सप्रेसला कल्याण जंक्शनवर थांबा देण्याची मागणी
कल्याण : कल्याण हे केवळ स्टेशन नाही, तर लाखो प्रवाशांच्या आयुष्याची नाडी आहे. विदर्भ-नागपूर, भुसावळला जाणाऱ्या दुरांतो एक्सप्रेसला कल्याणमध्ये थांबा नसल्याने सामान्य प्रवाशांचे हाल होत आहेत. हा अन्याय दूर करण्यासाठी आम्ही कल्याणकर सामाजिक संस्थेचे अध्यक्ष नितीन निकम यांनी बुधवारी कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची भेट घेऊन, दुरांतो एक्सप्रेसला कल्याण जंक्शनवर थांबा देण्याची आग्रही मागणी केली. खासदारांनी विषयाचे गांभीर्य ओळखून हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे.
