भाजपविरोधानंतरही मलिक राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक
मुंबई : देशाशी गद्दारी करणाऱ्यांसोबत व्यव्हार करणाऱ्या नवाब मलिकांसोबत भाजपा मांडीला मांडी लावून बसणार नाही अशी जाहिर भुमिका घेत नवाब मलिकांना कडवा विरोध भाजपाकडून करण्यात येत असतनाही  अजित पवार यांच्या  राष्ट्रवादीने आपल्या स्टार प्रचारकांच्या यादीत नवाब मलिकांचा समावेश केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपल्या ४० स्टार प्रचारकांची अधिकृत यादी जाहीर केली. महापालिकांच्या सत्तासंघर्षात विजयाचा झेंडा फडकवण्यासाठी पक्षाने अनुभवी आणि मोठ्या नेत्यांची तगडी फौज मैदानात उतरवली आहे. पक्षाची धोरणे आणि विकासकामे जनतेच्या मनापर्यंत पोहोचवण्यासाठी ही टीम महत्त्वाची भूमिका बजावेलअसा विश्वास सर्वांनी व्यक्त केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जाहीर केलेल्या या यादीत पक्षाचे ज्येष्ठ नेतेखासदारआमदार आणि आक्रमक प्रवक्ते यांचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजेस्थानिक पातळीवर जनसंपर्क असलेल्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनाही या यादीत स्थान देण्यात आले. निवडणूक प्रचार अधिक प्रभावी आणि व्यापक व्हावाया उद्देशाने पक्षाने आपल्या नेत्यांवर महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. विविध आरोप झालेले धनंजय मुंडे आणि नवाब मलिक दोघांचाही यादीत समावेश करण्यात आला आहे. मात्र नुकतेच मंत्रिपदावरून हकालपट्टी झालेल्या माणिकराव कोकाटेंना वगळण्यात आले आहे.
काँग्रेस पक्षाकडून स्टार प्रचारकांची नावे-
१. अजित पवार
२. प्रफुल पटेल
३. सुनील तटकरे
४. हसन मुश्रीफ
५. धनंजय मुंडे
६. नरहरी झिरवाळ
७. बाबासाहेब पाटील
८. मकरंद जाधव-पाटील
९. दत्तात्रय भरणे
१०. अण्णा बनसोडे
११. अदिती तटकरे
१२. इंद्रनील नाईक
१३. धर्मराव आत्राम
१४. अनिल पाटील
१५. संजय बनसोडे
१६. प्रताप पाटील चिखलीकर
१७. नवाब मलिक
१८. सयाजी शिंदे
१९. मुश्ताक अंतुले
२०. समीर भुजबळ
२१. अमोल मिटकरी
२२. सना मलिक
२३. रूपाली चाकणकर
२४. इद्रिस नायकवडी
२५. अनिकेत तटकरे
२६. झिशान सिद्धिकी
२७. राजेंद्र जैन
२८. शरद पाटील
२९. सिद्धार्थ टी. कांबळे
३०. सुरज चव्हाण
३१. लहूजी कानडे
३२. कल्याण आखाडे
३३. सुनील मगरे
३४. नाझेर काझी
३५. महेश शिंदे
३६. राजलक्ष्मी भोसले
३७. सुरेखा ठाकरे
३८. नजीब मुल्ला
३९. प्रतिभा शिंदे
४०. विकास पासलकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *