मनसेचे राज्य सचिव सुधाकर तांबोळी शिंदेसेनेत
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) राज्य सचिव तसेच मुंबई विद्यापीठाचे दोन वेळा सिनेट सदस्य राहिलेले सुधाकर तांबोळी यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. या प्रसंगी शिवसेनेच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक स्वागत करण्यात आले आणि त्यांच्या भावी राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमावेळी शिवसेनेचे सरचिटणीस राहुल शेवाळे, पदाधिकारी, ज्येष्ठ नेते आणि मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. सुधाकर तांबोळी यांच्या प्रवेशामुळे शिवसेनेची संघटनात्मक ताकद अधिक बळकट होईल, असा विश्वास यावेळी शिंदे यांनी व्यक्त केला. नुकतीच मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या युतीच्या पार्श्वभुमीवर हा पक्षप्रवेश करण्यात आल्यामुळे राजकीय वर्तुळात त्याची जास्त चर्चा होती.
