माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी जयंतीदिनी केडीएमसीतर्फे अभिवादन

कल्याण : भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती दिनी कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयात त्यांच्या प्रतिमेस महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी अति.आयुक्त योगेश गोडसे, उपायुक्त समीर भूमकर, महापालिका सचिव किशोर शेळके, लेखा अधिकारी राजू दराडे, माहिती व जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे, सहा.जनसंपर्क अधिकारी सुमित बोयत, सुरक्षा अधिकारी भरत बुळे व इतर कर्मचारी वर्ग यांनी देखील अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेस पुष्पसुमने अर्पण करुन अभिवादन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *