बारामती : देशाच्या राजकारणात विरोधकांचा भाजपानंतर सगळ्यात जास्त रोख जर कुणावर असेल तर तो उद्योगपती गौतम अदानींवर. या पार्श्वभुमीवर शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या पवार कुटुंबियांनी बारामतीत अदानींचे वाजत गाजत केलेले स्वागत देशाच्या राजकारणाला नवी दिशा देणार ठरणारे आहे. शरद पवार हे भाजपाप्रणित एनडीएत सहभागी होऊन केंद्रात सत्तेत जाणार अशा जोरदार चर्चा सुरू असतानाच आज सुप्रिया सुळेंनी मोदींचे लाडके उद्योगपती गौतम अदानींना जाहिरपणे आपला मोठा भाऊ मानल्यामुळे या चर्चांनी पुन्हा उधाण आले.

निमित्त होते अदानी उद्योग समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्या हस्ते शरद पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स या केंद्राच्या उद्घाटनाचे. आमदार रोहित पवार यांनी स्वतः ड्रायव्हिंग सीटवर बसून अदानींच्या गाडीचे सारथ्य केले. विशेष म्हणजेत्यांच्या बाजूला उपमुख्यमंत्री अजित पवार बसले होते. राजकीय मतभेद बाजूला ठेवून काका-पुतण्याने एकाच गाडीतून अदानींचे स्वागत केल्याने उपस्थित सर्वांच्याच भुवया उंचावल्या. त्यानंतर शरद पवार आणि पवार कुटुंबियांच्या उपस्थितीत भव्य केंद्राचे लोकार्पण पार पडले.
अदानी आणि पवार कुटुंबाचे गेल्या ३० वर्षापासून प्रेमाचे संबंध आहेत. माझ्यासाठी गौतम अदानी हे मोठ्या भावासारखे आहेत. कधी आयुष्यातील कुठलीही चांगली किंवा कडू बातमी कुठल्या भावाला सांगते तर ते हे आहेत. कधी कधी ते हक्काने मला रागवतात ही. गौतम अदानी हे फक्त भारतातच नाही तर जगातही यशस्वी झाले आहेत आणि याचा आम्हाला सार्थ अभिमान आहेअसे सुप्रिया सुळे म्हणाल्या. या विधानामुळे उद्योगपती आणि पवार कुटुंबातील जिव्हाळ्याचे संबंध पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहेत.
शरद पवार हे माझे मार्गदर्शक- गौतम अदानी
शरद पवारांना गेल्या तीन दशकांहून अधिक काळ ओळखणे हे माझे भाग्य आहे आणि त्यांच्याकडून मी जे काही शिकलो ते अतुलनीय आहे. ज्ञानापलीकडेत्यांची समजूतदारपणा आणि सहानुभूती ही सर्वात खोलवरची छाप सोडते. मी अनेक वेळा बारामतीला भेट दिली आहे आणि शरद पवार यांनी येथे जे साध्य केले आहे ते विकासापेक्षा खूप जास्त आहे. त्यांच्यासारखा नेता चांगले राजकारण काय असते हे दाखवतो. त्यांनी शेतीमध्ये परिवर्तन घडवून आणले आहेसहकारी संस्थांना बळकटी दिली आहे आणि उद्योजकतेला चालना दिली आहे,” असं गौतम अदानी यांनी म्हटलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *