बारामती येथे अदानी उद्योग समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्या हस्ते शरद पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स या केंद्राच्या उद्घाटन करण्यात आले. यावेळा खासदार शरद पवारांपासून ते उपमुख्यमंत्री अजित पवारांपर्यंत, खासदार सुप्रीया सुळेंपासून ते सुनेत्रा पवारांपर्यंत सारेज जण हजर होते. आमदार रोहीत पवारांनी तर अदनींसाठी चक्क कारचे सारथ्य केले… एकीकडे देशातील अवघा विरोधक अदानींच्या विरोधात एकवटलेला असताना याच विरोधकांच्या मांडीला मांडी लावून बसणारे राष्ट्वादी शरद पवार पक्ष मात्र अदानींसाठी पायघड्या घालतो हे दृष्य सामान्य मतदारांना मात्र गोंधळात टाकणारे आहे.
