मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंच्या मनसेसोबत आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तुतारीही वाजणार आहे. मुंबईत भाजपा आणि शिंदेंच्या शिवसेनेविरोधात उद्धव-राज आणि शरद पवारांची युती शड्डू ठोकरणार आहे. दुसरीकडे काँग्रेस आणि प्रकाश आंबेंडकरांच्या वंचितची आघाडी झाली असून अजित पवार मुंबईत स्वतंत्रपणे निवडणूक लढविणार आहे.

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला ठाकरेंच्या शिवसेना आणि मनसे यूतीकडून १० जागा देण्यात आल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा ५२ जागांचा प्रस्ताव होता. पण अखेर भाजापाच्या पराभवासाठी १० जागावर तडजोड करण्यात आली आहे.

गेल्या निवडणूकीत शरद पवारांच्या एकत्रित राष्ट्रवादीने ९ जागा जिंकल्या होत्या. अजित पवार स्वतंत्र लडणार असल्याचा फायाद अप्रत्यक्षरित्या भाजपाला होणार आहे. किंबहूना मुंबईत अजित पवारांनी स्वतंत्र लढावे ही भाजपाची रणनीती असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. नवाब मलिकांच्या निमित्ताने मुंबईत मुस्लिम बहुल मतदार संघात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा मोठा मतदार संघ आहे. पवार भाजपासोबत लढल्यास हा जनाधार एकतर उध्दव ठाकरे किंवा काँग्रेसकडे गेला असता ज्याचा फटका थेट भाजपाला पडला असता. त्यामुळे मुस्लिम मतातील विभाजनासाठी अजित पवारांची राष्ट्रवादी स्वतंत्र लढणे ही भाजपाची गरज आहे.

गेल्या २०१७ च्या  निवडणूकीत शिवसेनेने स्वतंत्रपणे लढून ८४ जागा जिंकल्या होत्या भाजपाने ८२ मनसेने ७ काँग्रेसने ३१ जागा जिंकल्या होत्या. या निवडणूकीत किमान १५ जागांवर मनसेच्या उमेदवारांमुळे ठाकरेंच्या उमेदवाराला पराभव पत्करावा लागला होता. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्याने त्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीची साथ त्यांना लाभल्याने मुंबईच्या  निवडणूकीत सध्यातरी ठाकरें बंधूनी आघाडी घेतल्याचे चित्र आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *