कोल्हापूर जिल्हा रहिवाशी सेवा संस्था व ताराराणी फाऊंडेशनतर्फे २०२६ दिनदर्शिकेचे भव्य प्रकाशन

दिवा : कोल्हापूर जिल्हा रहिवाशी सेवा संस्था आणि ताराराणी फाऊंडेशन प्रणित महिला बचत गटाच्या वतीने २०२६ सालाच्या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा रविवार, २८ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी संघटनेच्या कार्यालयात उत्साहात पार पडला. हा सोहळा संघटनेचे संस्थापक शंकर पाटील (काका) यांच्या मार्गदर्शना खाली पार पडला.

याप्रसंगी संघटनेचे पदाधिकारी व सभासद यांच्या हस्ते दिनदर्शिकेचे औपचारिक प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमाला दिवा शहरातील समस्त कोल्हापूरकर मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी कोल्हापूरची सांस्कृतिक परंपरा, सामाजिक एकोपा आणि सेवाभाव अधोरेखित करणाऱ्या या उपक्रमाचे कौतुक केले. दिनदर्शिकेत वर्षभरातील महत्त्वाचे सण- उत्सव, सामाजिक उपक्रम, तसेच कोल्हापूरच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक ओळखीचे संदर्भ समाविष्ट करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. महिला बचत गटांच्या माध्यमातून झालेला हा उपक्रम महिला सक्षमीकरण आणि सामाजिक बांधिलकीचा आदर्श असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांचे आभार मानत, पुढील काळातही असेच उपक्रम राबविण्याचा निर्धार संघटनेच्या वतीने व्यक्त करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *