दिवंगत कॉम्रेड गुलाबराव गणाचार्य वाचनालयाचे झाले उद्घाटन
केतन खेडेकर
मुंबई: गुलाबराव गणाचार्य चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सायन कोळीवाडा येथे नुकतेच स्वातंत्र्यसैनिक झुंजार कामगार नेते व ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते दिवंगत कॉम्रेड गुलाबराव गणाचार्य यांच्या स्मरणार्थ वाचनालयाचे उद्घाटन जल्लोषात करण्यात आले. सदर प्रसंगी कामगार नेते अनिल गणाचार्य यांच्या शुभहस्ते झेंडावंदन करण्यात आले. या कार्यक्रमांमध्ये दिनाच्या यांनी केलेल्या विविध आंदोलनाबाबत उपस्थित नागरिकांनी उजाळा दिला. तसेच गणाचार्य यांनी त्यावेळेला लोकांसाठी जेलमध्ये जाणे पसंत केले पण ती कधीही हुकूमशाही पुढे झुकले नाही अशी आठवण देखील या कार्यक्रमात लोकांनी काढली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष कचरा वाहतूक कामगारांचे नेते काँ. विजय दळवी होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक कचरू यादव, सुधाकर सुराडकर मा. पोलीस महासंचालक, सुकुमार दामले, राष्ट्रीय सेक्रेटरी आयटक. कॉ.मिलिंद रानडे, कामगार नेते, सुनील गणाचार्य कामगार नेते, उपस्थित होते.
