शालेय राज्यस्तरीय बेसबॉल स्पर्धेत पुणे विभागाच्या मुलांचा तर नाशिक विभागाच्या मुलींचा विजय अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे यांची प्रमुख उपस्थिती
अशोक गायकवाड
पालघर :सफाळे येथे आयोजित शालेय राज्यस्तरीय १९ वर्षांखालील मुला-मुलींच्या बेसबॉल स्पर्धांनी राज्यातील क्रीडाविश्वाचे लक्ष वेधून घेतले. डॉ. पांडुरंग वामन अमृते शिक्षण संस्था, सफाळे येथे दिनांक २६ ते २८ डिसेंबर २०२५ या कालावधीत पार पडलेल्या या स्पर्धांमध्ये राज्यातील सर्व विभागांतील संघांनी सहभाग नोंदवत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. मुंबई, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, कोल्हापूर, पुणे, लातूर व अमरावती या विभागांमधील संघांमध्ये चुरशीच्या लढती रंगल्या. मुलांच्या गटात पुणे विभागाने दमदार खेळ करत विजेतेपद पटकावले, तर मुलींच्या गटात नाशिक विभागाने उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांकावर आपले नाव कोरले. उद्घाटन सोहळा उत्साहात स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी जिल्ह्याचे अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे, डॉ. अमृते शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष खांतीलाल दोशी व सरचिटणीस ॲड. दीपक भाते, प्राचार्या मधुमती कुलकर्णी, मुख्याध्यापिका सुचिता पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांनी खेळाडूंना शुभेच्छा देत क्रीडास्पर्धांचे महत्त्व अधोरेखित केले.
यशस्वी आयोजनाबद्दल जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी केला गौरव पालघर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांचे अभिनंदन करत सहभागी सर्व खेळाडूंना उज्ज्वल क्रीडा भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. “अशा राज्यस्तरीय स्पर्धांमुळे ग्रामीण व शहरी भागातील खेळाडूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळते. खेळातून शिस्त, संघभावना व नेतृत्वगुण विकसित होतात,” असे त्यांनी आपल्या संदेशात नमूद केले.
जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास व्हनमाने यांची प्रतिक्रिया “शालेय स्तरावर अशा राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन होणे ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. या स्पर्धांमधून विद्यार्थ्यांमध्ये क्रीडावृत्ती, शिस्त, संघभावना व नेतृत्वगुण विकसित होतात. पालघर जिल्ह्यात प्रथमच एवढ्या मोठ्या स्तरावर बेसबॉल स्पर्धेचे यशस्वी आयोजन झाले असून, आयोजक संस्था, क्रीडा संघटना, पंच, प्रशिक्षक, स्वयंसेवक तसेच सर्व सहभागी खेळाडूंनी दिलेल्या सहकार्यामुळे ही स्पर्धा अत्यंत यशस्वी ठरली. भविष्यातही अशा स्पर्धांच्या माध्यमातून राज्याला व देशाला दर्जेदार खेळाडू मिळतील, असा विश्वास आहे,” असे प्रतिपादन जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास व्हनमाने यांनी केले. स्पर्धेचा अंतिम निकाल मुले – १९ वर्षांखालील प्रथम : पुणे विभाग द्वितीय : कोल्हापूर विभाग तृतीय : नाशिक विभाग चतुर्थ : मुंबई विभाग मुली – १९ वर्षांखालील प्रथम : नाशिक विभाग द्वितीय : नागपूर विभाग तृतीय : अमरावती विभाग चतुर्थ : कोल्हापूर विभाग समारोपावेळी विजेत्या व उपविजेत्या संघांना जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास व्हनमाने, महाराष्ट्र राज्य बेसबॉल असोसिएशन उपाध्यक्ष इंद्रजित नितमवार, तांत्रिक समिती प्रमुख अशोक सरोदे, राज्य समन्वयक प्रितीश पाटील, आशिष पाटील, नितीन म्हात्रे, संपदा चौधरी, रमाकांत घरत, जतिन कदम, अंजली लाडे, अनिलकुमार वझे, प्रियंका पाटील, उपप्रचार्या सुजाता घरत, यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. यशस्वी आयोजनाबद्दल सर्व स्तरातून समाधान व्यक्त करण्यात आले असून, भविष्यातही अशा राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचे सातत्याने आयोजन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. महाराष्ट्र संघ १९ वर्षाखालील मुले १. मंगेश राऊत पुणे २. श्रीवर्धन बनसोडे कोल्हापूर ३. विरेन माने कोल्हापूर ४. युवराज कुशवाह मुंबई ५. अनिल गवळी नाशिक ६. लकी चाकार अमरावती ७. यश गोरे मुंबई ८. हर्ष धनमेहेर मुंबई ९. राजवर्धन शिरसाट पुणे १०. प्रताप पाटील पुणे ११. श्रेयश राठोड अमरावती १२. आकाश गारडे पुणे १३. वेदांत राऊत मुंबई १४. विभीषण चव्हाण छत्रपती संभाजी नगर १५. वंश चव्हाण कोल्हापूर १६. अयान शेख लातूर राखीव १. चंदन झाळके अमरावती २. हितेश सतरे नागपूर ३. ध्रुव राजपूत नाशिक ४. कौस्तुभ साळुंके छत्रपती संभाजी नगर ५. पार्थ जाधव अमरावती महाराष्ट्र संघ १९ वर्षाखालील मुली १. नेहा जाधव नाशिक २. तक्षिला जाधव नाशिक ३. शीला सोनवणे नागपूर ४. संजीवनी समदुरे अमरावती ५. गौरी जाधव कोल्हापूर ६. सई चव्हाण पुणे ७. राजनंदिनी कुमडाले लातूर ८. समृद्धी गाडेकर पुणे ९. प्रांजली चौरे छत्रपती संभाजीनगर १०. राजश्री गाडेकर छत्रपती संभाजी नगर ११. मानसी गायकवाड मुंबई १२. ऋतुजा जाधव नाशिक १३. प्रगती ठोंबरे कोल्हापूर १४. कशिश बैस अमरावती १५. प्रणिता कणसे पुणे १६. सुधा शिंदे लातूर राखीव १. रूप कुमारी महातो नागपूर २. भाग्यश्री रुसले अमरावती ३. मीरा शाहू नागपूर ४. स्वराली मांजरे पुणे ५. प्रतीक्षा राठोड नाशिक.
