आहार नियंत्रण केले तर वजन कमी होऊ शकेल, वजन कमी झाले तर शरीरात चपळता येईल, उत्साह वाढेल आणि एकंदरीतच स्वास्थ्य चागले राहील असे आपण आजवर ऐकत आलो आहोत. परंतु एका नव्या संशोधनानुसार तुम्ही असा कोणताही आहार नियंत्रणाचा प्रकार अमलात आणलात तरी त्याचे परिणाम होणे एका वर्षाच्या आत जवळजवळ थांबेल. हा संशोधन प्रकल्प जागतिक पातळीवरचा असल्याने आहार नियंत्रण करणारांची पचाईत झाली आहे.
अमेरिका, चीन, स्वित्झर्लंड आणि कॅनडा या चार देशांचा या प्रकल्पात सहभाग होता. या संशोधनात असे दिसून आले की वजन कमी करण्यासाठीच्या कोणत्याही आहार नियंत्रणात वजन कमी होणे तसेच हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या संदर्भातील सुधारणा पहिल्या सहा महिन्यात जवळजवळ सारख्याच असतात. वर्षभराने मात्र यापैकी बहुतेक फायदे ‘गायब’ झालेले असतात. हे संशोधन सुप्रसिद्ध विज्ञान नियकालिक असलेल्या ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे. एक निष्कर्ष असाही दिसला. आहे की भूमध्य प्रकारचा आहार एक वर्षानंतरही निदान नकारातत्मक कोलेस्टेरॉल कमी करणे सुरु ठेवताना आढळला.
आणखी एक निष्कर्ष असा की सर्वात लोकप्रिय आहार कार्यक्रमांच्या फायद्यामधील फरक नगण्य होता, या निष्कर्षानंतर संशोधक म्हणतात की असे आहार नियंत्रण करणारांनी कंपन्यांच्या जाहिरातीत सांगितलेल्या फायद्यांचा विचार न करता स्वत:च्या सर्वात आवडीचा वजन कमी करण्याचा कार्यक्रम हाती घ्यावा.
लट्ठपणा तसेच हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या प्रश्नासंदर्भात कायमचा इलाज अशी जाहिरात करणाऱ्या अशा शेकडो आहार प्रकारांच्या जाहिराती येत असतात. परंतु या बाबतीत तुलनात्मक आणि सर्वसमावेशक असे विश्लेषण अजूनही केले गेलेले दिसत नाही यातील आहाराच्या पद्धतीसाठी उत्पादनाचे बाजारातील नाव किंवा या आहारातून मिळणाऱ्या कमी कार्ब, कमी चरबी इत्यादी सूक्ष्म पोषण घटकांचा आराखडा यांचे समूह तयार केले गेले होते.
सामान्य आहाराच्या तुलनेत कमी कार्ब, कमी चरबी आहारांमुळे सहा महिन्यांच्या कालावधीनंतर वजनात काहीशी म्हणजे साधारण चार-पाच किलोच्या आसपास घट आणि सोबत रक्तदाबही काहीसा कमी झालेला दिसला. मात्र या मानाने सूक्ष्म पोषण घटकांचा आराखडा असलेल्या आहारांनी वजनही फारसे घटवले नाही आणि हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या बाबतीतही फारसा साकारात्मक परिणाम दाखवला नाही ही बाब नमूद केली गेली. नामवंत अशा आहार पद्धतींमुळेही असेच परिणाम मिळाले पण यापैकी कोणत्याही पद्धतीमुळे ‘चांगले’ कोलेस्टेरॉल वाढले आहे असे मात्र आढळले नाही. संशोधन करणाऱ्या एका विद्यापीठानुसार पर्याय सगळीकडे होते परंतु स्पष्ट असा ‘विजयी’ आहार मात्र आढळला नाही.
याचाच अर्थ असा की आहाराची निवड करताना कमी वेळ दिला तरी चालेल पण एकदा आपले वजन आवश्यकतेनुसार कमी झालेले दिसेल तेव्हा आणि त्यानंतर आपले वजन वाढणार नाही (झालेली वजन घट कायम राहील) याकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे, आहाराची वजन घात केवळ बारा महिन्यांची असते हे आणखी लक्षात घ्यायला हवे.
एखाद्या लोकसंख्या समूहाचेच वजन घटवण्याच्या प्रयत्नात कुणी असेल तर त्यांनी आज अशा उत्पादनांचे मार्केटिंग करण्यासाठी आणि ग्राहक टिकवून ठेवण्यासाठी कोणते प्रयत्न करतात त्याची माहिती करून घ्यावी आणि या माहितीचा अभ्यास करून आपली आरोग्य आहाराची रोपणी ग्राहकांच्या मनात करावी असे म्हणता येईल. हे संशोधन ब्रिटिश मेडिकल जर्नल या (बीएमजे) मध्ये प्रसिद्ध झाले आहे.
प्रसन्न फीचर्स
काहीतरी नवीन…
श्याम तारे
