अशोक गायकवाड
रायगड-अलिबाग : कर्करोगाचा लवकर शोध लागून वेळेत उपचार मिळावेत, या उद्देशाने जिल्ह्यात १ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२६ या कालावधीत विशेष कर्करोग तपासणी मोहीम राबविण्यात येणार असून जिल्ह्यातील नागरिकांनी या मोफत कर्करोग तपासणी मोहीमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निशिकांत पाटील यांनी केले आहे. उपसंचालक,आरोग्य सेवा ठाणे यांच्या स्तरावरून जिल्ह्यासाठी कॅन्सर व्हॅन उपलब्ध करून देण्यात येणार असून ए.टी.पी.नुसार ही मोहीम राबविली जाणार आहे. या कॅन्सर व्हॅनसोबत एक स्त्रीरोगतज्ज्ञ, एक दंत शल्यचिकित्सक तसेच एक सहाय्यक परिचारिका उपस्थित राहणार असून प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून गावागावातील नागरिकांची कर्करोग तपासणी करण्यात येणार आहे. एका दिवसात किमान १५० नागरिकांची तपासणी करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. कर्करोगासारख्या गंभीर आजाराबाबत जनजागृती होऊन नागरिकांनी वेळेत तपासणी करून घ्यावी तसेच ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचावी हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. या मोहिमेसाठी डॉ. र्किती रंगनाथन, वैद्यकीय अधिकारी जि.रु. अलिबाग, डॉ.श्रेया पाटील, वैद्यकीय अधिकारी जि.रु. अलिबाग, डॉ. ऋ पीकेश कुलकर्णी वैद्यकीय अधिकारी ग्रा.रु. महाड, डॉ. रामदास तारपेवाड वैद्यकीय अधिकारी उप जि..रु. माणगाव, डॉ. कृष्णा सोनावने वैद्यकीय अधिकारी जि.रु. अलिबाग, डॉ. अश्विनी सोनावले वैद्यकीय अधिकारी ग्रा. रु.चौक, डॉ. स्वाती नाईक वैद्यकीय अधिकारी उप जि.रु. पनवेल, डॉ. भानुदास गिरी, वैद्यकीय अधिकारी ग्रा.रु. महाड, डॉ. नविना ठाकूर, दंतशल्यचिकित्सक, जि. रु अलिबाग, डॉ. झापकर, दंतशल्यचिकित्सक, ग्रा.रु. उरण, डॉ. प्रदयुम्न ठोंबरे दंतशल्यचिकित्सक, ग्रा.रु. महाड, डॉ. ऋतुजा माळी, दंतशल्यचिकित्सक, जि. रु अलिबाग, डॉ. गणेश मेंगाळ, दंतशल्यचिकित्सक, उप जि. रु. कर्जत, डॉ. सायली बेलगे, दंतशल्यचिकित्सक, उप जि.रु. पनवेल, डॉ. शेखर वानखेडे, दंतशल्यचिकित्सक, ग्रा.रु मुरुड, डॉ. अमोल नगराळे, दंतशल्यचिकित्सक, उप जि.रु.पेण, डॉ. राजन यादव, दंतशल्यचिकित्सक, ग्रा.रु. चौक, डॉ. अतुल देशमुख, दंतशल्यचिकित्सक, ग्रा.रु. कशेली, अनिकेत गोसावी, अधिपरिसेवक जि. रु अलिबाग,  प्रियंका माने, अधिपरिसेविका जि. रु अलिबाग, र्हषा राऊत, सहाय्यक परिचारीका भाल, प्रणाली माळी, सहाय्यक परिचारीका वाघोली,  शिल्पा ठाकुर, सहाय्यक परिचारीका र्कोलई,  सिमा बारकुल, सहाय्यक परिचारीका तळा,  ज्योती महाडिक, सहाय्यक परिचारीका नेवरुळ,  गितांजली पाटील, सहाय्यक परिचारीका पाभरे,  लतिका भांगोजी, सहाय्यक परिचारीका दिघी,  मनीषा मोरे, सहाय्यक परिचारीका कापडे,  अंजली जांधव, सहाय्यक परिचारीका टोल,  सुगंधा ढवळे, सहाय्यक परिचारीका वरंध,  जयश्री वाघमारे, सहाय्यक परिचारीका निझामपूर , सविता पेढवी, सहाय्यक परिचारीका साई,  अर्पणा मखर, सहाय्यक परिचारीका धाटाव,  स्नेहल चांदोरकर, अधीपरिचारीका रोहा,  दर्शना पाटील, सहाय्यक परिचारीका जांभूळपाडा,  काशी वाघ, सहाय्यक परिचारीका आराव,  हर्षदा पाटील, सहाय्यक परिचारीका आमटेम, भावना महाले, सहाय्यक परिचारीका अंजप,  ज्योती ओव्हाळ, अधीपरिचारीका कर्जत,  सुर्वणा मोरे, सहाय्यक परिचारीका होणंद,  अर्चना चव्हाण, सहाय्यक परिचारीका वडखळ,  संजना सोनाबने, सहाय्यक परिचारीका अजिवली, अमृता ढाकणे, सहाय्यक परिचारीका पोयंजे, सुप्रिया वाडकर, सहाय्यक परिचारीका,जासई . मोनाली पाटील, अधीपरिचारीका उरण सेवा उपलब्ध राहणार आहे. याशिवाय अनिकेत गोसावी,  प्रियंका माने यांच्यासह जिल्ह्यातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्रांतील अधीपरिचारिका व सहाय्यक परिचारिकांचा समावेश या मोहिमेत करण्यात आला आहे.
००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *