अर्ज माघारीवरून
मनसे पदाधिकाऱ्याची
सोलापूरात हत्या
सोलापूर : महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरात राजकीय वादातून मनसे विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी असलेल्या बाळासाहेब सरवदे यांची राजकीय वादातून हत्या झाली आहे.
सोलापूर महापालिका प्रभाग २ मध्ये अर्ज माघारी घेण्यावरून आज भाजपच्या दोन गटात वाद झाला. प्रभाग दोनमध्ये शालन शिंदे ह्या भाजपच्या अधिकृत उमेदवार आहेत, तर त्यांच्याविरोधात भाजपच्या बंडखोर रेखा सरवदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. रेखा सरवदे यांनी अर्ज माघारी घ्यावा यासाठी शिंदे आणि सरवदे या दोन गटात मोठा वाद झाला, या वादात भाजप नेते शंकर शिंदे यांचे कार्यालय देखील फोडण्यात आले. मात्र, त्याचवेळी शिंदे गटाच्या लोकांनी मध्यस्तीसाठी आलेल्या बाळासाहेब सरवदे यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप सरवदे यांच्या नातेवाईकांनी केला आहे. ह्या हल्यात गंभीर जखमी झालेल्या बाळासाहेब सरवदे यांना उपचारासाठी सोलापूरच्या सहकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. दरम्यान, बाळासाहेब सरवदे हत्याप्रकरणातील ४ संशयितांना सोलापुरातील जेलरोड पोलिसांनी ताब्यात घेतले असून उर्वरित आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
