काम करूनही हक्काचे वेतन मिळाले नाही तर निवडणूकीवर सफाई कामगारांचा बहिष्कार – जगदीश खैरालिया
अनिल ठाणेकर
ठाणे : कामगारांना काम करून ही हक्काचे वेतन मिळाले नाही तर यंदाच्या निवडणूकी वर सर्व सफाई कामगार बहिष्कार घालतील असा इशारा श्रमिक जनता संघ युनियनचे सरचिटणीस जगदीश खैरालिया, संघटक दीनानाथ देसले, अनिता कुंभावत यांच्या नेतृत्वाखाली कामगारांनी निवेदन सादर करीत ठाणे प्रादेशिक मनोरूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ नेताजी मुळीक यांना भेटून इशारा दिला आहे.
ठाणे प्रादेशिक मनोरूग्णालयातील सफाई कर्मचाऱ्यांचे किमान वेतन कायद्यानुसार वेतनासाठी अनेक वर्षे लढा सुरू आहे. औद्योगिक न्यायालयाचे आदेश ठेकेदार आणि रूग्णालय प्रशासन जुमानत नाही. ठाणे लेबर कोर्टात न्यायालयाचे अवमान प्रकरणी प्रलंबित आहे. मुंबई हायकोर्टात किमान वेतनाच्या फरकाची थकीत रक्कम बाबतीत सुनबाई प्रलंबित आहे.परंतु ठेकेदार मेसर्स लोकराज्य स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था, पुणे आणि मनोरूग्णालय प्रशासन जुमानत ठाण्यात कायद्याचे राज्य आहे का? अशी परिस्थिती आहे. ठेकेदाराने कामगारांना विहित वेळेत वेतन अदा केले नाही तर मूळ मालक म्हणून रूग्णालय प्रशासनाने कामगारांना वेळेत वेतन अदा करणे हे कंत्राटी कामगार कायद्याच्या कलम २१(४) नुसार बंधनकारक असताना देखील सफाई कामगारांना नोव्हेंबर तुटपुंजे वेतन देखील नोव्हेंबर महिन्याचे वेतन आजपर्यंत अदा करण्यात आले नाही. म्हणून सर्व कामगारांनी १ जानेवारी २०२६ रोजी उपासी पोटी नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. व कामगारांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा नाही तर किमान हक्काचे वेतन अदा करा. अशी मागणी केली. नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यांचे थकित वेतन ताबडतोब अदा केले नाही तर नाईलाजाने उग्र आंदोलन करण्यात येईल तसेच ठाण्यात उपमुख्यमंत्री, दोन खासदार, तीन आमदार असताना देखील कामगारांना काम करून ही हक्काचे वेतन मिळाले नाही तर यंदाच्या निवडणूकी वर सर्व सफाई कामगार बहिष्कार घालतील असा इशारा देण्यात आला आहे. श्रमिक जनता संघ युनियनचे सरचिटणीस जगदीश खैरालिया, संघटक दीनानाथ देसले, अनिता कुंभावत यांच्या नेतृत्वाखाली कामगारांनी निवेदन सादर करीत ठाणे प्रादेशिक मनोरूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ नेताजी मुळीक यांना भेटून इशारा दिला आहे.
