मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक ॲण्ड जनरल एम्प्लॉईज युनियनच्या “दिनदर्शिका २०२६” चे प्रकाशन
मुबई, मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक ॲण्ड जनरल एम्प्लॉईज युनियनच्या “दिनदर्शिका २०२६” चे प्रकाशन मुंबई बंदर प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. एम. अंगमुथु यांच्या शुभहस्ते ३० डिसेंबर २०२५ रोजी पोर्ट भवनच्या बोर्ड रूममध्ये संपन्न झाले, अशी माहिती कामगार नेते मारुती विश्वासराव यांनी दिली.
याप्रसंगी ज्येष्ठ कामगार नेते ॲड. एस. के. शेट्ये, युनियनचे जनरल सेक्रेटरी सुधाकर अपराज, कार्याध्यक्ष डॉ. यतीन पटेल, मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे बोर्ड मेंबर प्रदीप नलावडे, युनियनचे सेक्रेटरी विद्याधर राणे, दत्ता खेसे, विजय रणदिवे, मनीष पाटील, खजिनदार विकास नलावडे, उपाध्यक्ष शीला भगत, संघटक चिटणीस प्रवीण काळे, आप्पा भोसले, मीर निसार युनुस, संतोष कदम आदी मान्यवर उपस्थित होते.
