ठाणे महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना, भाजपा आणि रिपब्लिकन सेनेच्या युतीच्या बिनविरोध निवडूण आलेल्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. यामध्ये सुखदा मोरे, जयश्री फाटक, जयश्री डेव्हिड, सुलेखा चव्हाण, शीतल ढमाले, एकता भोईर आणि राम रेपाळे यांचा समावेश होता. यावेळी खासदार नरेश म्हस्के, माजी आमदार रवींद्र फाटक, शिवसेना सचिव संजय मोरे, विभागप्रमुख एकनाथ भोईर, शिवसेना उमेदवार दीपक वेतकर, प्रवक्ते राहुल लोंढे उपस्थित होते.
