‘नो व्हिस्की, नो बियर….हॅप्पी न्यू इयर!
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचा प्रबोधनात्मक उपक्रम
अनिल ठाणेकर
ठाणे, सरत्यावर्षाची अखेर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती, ठाणे जिल्ह्यातर्फे नववर्षी ‘द दारूचा नव्हे तर द दुधाचा’ या उपक्रमांतर्गत ‘नो व्हिस्की, नो बियर….हॅप्पी नु इयर’ हा प्रबोधनात्मक कार्यक्रम राबविण्यात आला. यावेळी कल्याण व डोंबिवली शाखेतर्फे रेल्वे स्टेशन परिसथात मोफत मसाले दुधाचे वाटप करण्यात आले. महा. अंनिस ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. सुषमा बसवंत, अंधश्रद्धा निर्मुलन पत्रिकेचे कार्यकारी संपादक उत्तम जोगदंड, ठाणे जिल्बा प्रधान सचिव राजेश देवरुखकर, कल्याण शाखा कार्याध्यक्ष मंगल मोरे व डोंबिवली शाखेचे कार्याध्यक्ष गुलाब सूर्यवंशी या पदाधिकार्यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती, दरवर्षी १५ ते ३१ डिसेंबर या दरम्यान व्यसन विरोधी अभियान महाराष्ट्रभर चालवीत असते. समाजात व्यसनाला प्रतिष्ठा मिळून तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात व्यसनाला बळी पडत आहे. नवीन वर्षाचे स्वागत दारू पिऊन केले पाहिजे हा चुकीचा समज रूढ होवू पहात आहे. व्यसन हे माणसाचा विवेक नष्ट करते ही महाराष्ट्र अंनिसची भूमिका आहे. यामुळे पोलीस निरीक्षक पवार यांच्या हस्ते मसाला दुधाचे वाटप करुन या उपक्रमाचे उद्घाटन करण्यातआले. द दारूचा नव्हे तर द दुधाचा’ या उपक्रमांतर्गत ‘नो व्हिस्की, नो बियर….हॅप्पी नु इयर’ हा प्रबोधनात्मक कार्यक्रम करण्यात आला. यावेळी व्यसनमुक्तीच्या घोषणा देण्यात आल्या. तसेच व्यसनांचा मानवी शरीरावर होणार्या परिणामांची माहीती, रेल्वे स्टेशन परिसरातील प्रवासी, स्टाॅलधारक, फेरीवाले, रिक्षावाले यांना देऊन व्यसनांपासून दूर रहाण्याचे आवाहन करण्यात आले.यावेळी डाॅ सुरेश कापरे, छाया गायकवाड, संजय त्रिभुवन, ज्योती मेश्राम, शरद लोखंडे, किरण इशी, नितीन वानखेडे, पवन घीवरे, विनोद गगताप, सुनील घोरपडे,अविनाश दोंदे, सावित्री जोगदंड आदी पदाधिकारी उपस्थित होते.
