..ही तर शतकमहोत्सवी विधानपरिषदेची देणगी

योगेश वसंत त्रिवेदी यांनी व्यक्त केली कृतज्ञता

मुंबई : साप्ताहिक ‘आहुति’च्या हीरकमहोत्सवी समारंभाचे अध्यक्षस्थान भूषविण्याची संधी मिळाली, ही तर शतकमहोत्सवी विधानपरिषदेची देणगीच आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेश वसंत त्रिवेदी यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

अंबरनाथ येथील रोटरी सभागृहात हा समारंभ दणक्यात पार पडला. कार्यक्रमाला ‘प्रहार’चे संपादक पद्मभूषण देशपांडे, तसेच उपसंचालक व ठाणे जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. आमदार किसन कथोरे, डॉ. बालाजी किणीकर, तसेच नगराध्यक्षा तेजश्री करंजुळे आणि रुचिता घोरपडे यांची विशेष उपस्थिती लाभली.

त्रिवेदी म्हणाले की, विधानपरिषदेच्या शताब्दी वर्षानिमित्त तयार झालेल्या कार्यवाही व ठरावांवरील ग्रंथांच्या संपादनाची जबाबदारी पार पाडण्याची संधी लाभली. या कार्याची दखल घेऊन ‘आहुति’च्या हीरकमहोत्सवी समारंभाचे अध्यक्षस्थान देण्यात आले, ही अंबरनाथकरांचा सन्मानाची बाब असल्याचे ते म्हणाले.

‘आहुति’च्या साठ वर्षांच्या वाटचालीत अंबरनाथच्या स्थानिक प्रश्नांवर ठाम भूमिका घेत जनहिताचे भक्कम काम करणारे हे साप्ताहिक असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रामाणिक व नि:पक्ष पत्रकारितेचा वारसा जपण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *