आता एकावे ते अजबच !

अंबरनाथमध्ये शिंदेंना डावलून

भाजपाची काँग्रेसशी युती

ठाणे : सत्तेसाठी वाटेल ते याचा रोज नवनवा प्रत्यय समोर येतोय. एकण्यास… वाचण्यात अजब वाटेल पण हे सत्य आहे. राज्यात महायुतीत एकत्र असणाऱ्या भाजपाने अंबरनाथमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना डावलून चक्क काँग्रेसशी युती केलीय.

अंबरनाथ नगरपरिषदेत शिवसेना शिंदे गटाला भाजपनं धक्का दिला आहे. शिंदे गटाला बाजूला ठेवत भाजप आणि काँग्रेस अंबरनाथ नगरपरिषदेत एकत्र आल्यानं खळबळ उडाली आहे.
काँग्रेसच्या जोरावर भाजपा अंबरनाथ परिषदेत बहुमतात येणार आहे. ही अभद्र युती असल्याची टीका शिवसेनेने केली आहे.
अंबरनाथ नगरपरिषदेत भाजपचे १६, काँग्रेसचे १२ आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ४ अशा एकूण ३२ नगरसेवकांची मोट भाजपाने बांधली आहे. शिवसेना शिंदे गट या अंबरनाथ नगरपरिषदेत सर्वाधिक २३ जागांवर विजय मिळवूनही सत्तेपासून दूर राहीला आहे.
देशात काँग्रेसमुक्त भारत करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी करीत असताना अंबरनाथमधिल ही युती राजकीय तज्ज्ञांच्या भुवया उंचावणारी आहे.

एकीकडे काँग्रेसमुक्त भारत करणाऱ्या भाजपाने काँग्रेसची हात मिळवणी करत शिवसेनेचा घात केल्याचं शिवसेना शिंदे गटाचे आमदार बालाजी किणीकर यांनी म्हटलं आहे.

गेल्या पंचवीस वर्षापासून भ्रष्टाचार केलेल्या शिंदे गटाला सोबत घेऊन जर सत्तेत बसलो असतो तर ती अभद्र युती झाली असती असं भाजपा उपाध्यक्ष गुलाबराव करंजुले पाटील यांनी म्हटलं आहे. आम्ही अंबरनाथ नगर परिषदेसाठी शिवसेना शिंदे गटासोबत महायुती संदर्भात अनेकदा बोलणी करण्याचा प्रयत्न केलामात्र त्यांच्या नेत्यांनी प्रतिसाद दिला नाही असे देखील पाटील यांनी म्हटलं आहे.
अंबरनाथ नगरपरिषदेवर भाजपने झेंडा फडकला होता. याठिकाणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. याठिकाणी शिवसेना शिंदे गटाकडून मनिषा वाळेकर आणि भाजपकडून तेजश्री करंजुले पाटील यांच्यामध्ये नगराध्यक्षपदासाठी चुरशीची लढत झाली. या निवडणुकीत भाजपच्या तेजश्री करंजुले या विजयी झाल्या होत्या. या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष भाजपाचा झाला असला तरी देखील याठिकाणी सर्वाधिक नगरसेवकपदाचे उमेदवार शिवसेनेचे विजयी झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *