मुंबईच्या मतदार यादीला विलंब
मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीला जेमतेम सात दिवस शिल्लक असताना अंतिम मतदार यादी अद्याप प्रसिद्ध झालेली नाही. दुबार नावांच्या आरोपांमुळे यंदाच्या मतदार यादीवरून राजकीय पक्षांनी खूप आरोप – प्रत्यारोप केले होते. अद्याप अंतिम मतदार यादी जाहीर न होणे हा अत्यंत गंभीर प्रकार असून, यामुळे मतदारांचे घटनात्मक व लोकशाही हक्क डावलले जात असल्याचा आरोप होऊ लागला आहे. मुंबई महापालिका प्रशासनाने मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत.
मुंबई महापालिकेची निवडणूक येत्या १५ जानेवारी रोजी होणार असून केवळ आठ-नऊ दिवस शिल्लक आहेत. मात्र तरीही मुंबई महापालिकेने अद्याप अंतिम मतदार यादी प्रसिद्ध न केल्यामुळे चर्चा होऊ लागली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्ते अनिल गलगली यांनी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्त, तसेच मुंबई महानगरपालिका आयुक्तांकडे मुंबई महानगरपालिकेच्या २२७ प्रभागांची अंतिम मतदार यादी तातडीने जाहीर करण्याची मागणी केली आहे.

अंतिम मतदार यादी वेळेत उपलब्ध न झाल्यामुळे मतदारांना आपली नावे तपासता येत नाही. या हलगर्जीपणाला नेमके कोण जबाबदार आहेनिवडणूक यंत्रणा व प्रशासनाने कायदेशीर कालमर्यादा का पाळल्या नाहीतअसा सवाल अनिल गलगली यांनी उपस्थित केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *