अवैधरित्या पिस्टल बाळगणाऱ्या इसमाच्या कोळसेवाडी पोलीसांनी आवळल्या मुसक्या

कल्याण : कोळसेवाडी पोलीस ठाणे हद्दीत नेतीवली परिसरात एक इसम पिस्टल घेवुन फिरत असल्याची बातमी पोलीस पथकास मिळाली होती. त्याप्रमाणे कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने नेतीवली कल्याण पुर्व परिसरात मंगळवारी रात्री ११ वाजता सापळा रचुन जुने धान्य गोडावुन जवळुन आरोपी करण जितु निशाद, याला ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीमध्ये एक स्टीलचे २५ हजार रु. किंमतीचे पिस्टल जप्त करण्यात आलेले आहे. या आरोपीस अटक करण्यात आली असुन, गुन्हयाचा पुढील तपास सहा. पोलीस निरी. संदिप भालेराव हे करत आहेत. आरोपीचे नाव करण जितु निशाद, वय.२१वर्षे, देसलेपाडा, डोंबिवली पुर्व येथे राहणारा आहे. हि कामगिरी पोलीस उप आयुक्त अतुल झेंडे,  सहा पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोळसेवाडी पोलीस ठाणे हेमंत गुरव, पोलीस निरीक्षक (गुन्हे) गणेश न्हायदे यांच्या मार्गदर्शनाखाली कोळसेवाडी पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाचे सहा पोलीस निरीक्षक संदिप भालेराव, पो.ह.  विशाल वाघ, गोरखनाथ घुगे, सचिन आव्हाड, दत्तु जाधव, पो.ना. दिलीप कोती यांनी केलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *