प्रभाग क्र. १२ मध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराला वंचित बहुजन आघाडी, बहुजन विकास आघाडीसह आरपीआयचा पाठींबा

कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १२ मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार विक्रांत जगन्नाथ शिंदे यांना सलग तीन राजकीय पक्षांनी आपला पाठींबा जाहीर केला आहे. वंचित बहुजन आघाडी, बहुजन विकास आघाडीपाठोपाठ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)पक्षानेही विक्रांत शिंदे यांना पाठिंबा जाहीर करत बहुमताने निवडून आणण्याचे आवाहन केले आहे. यासंदर्भात तिन्ही पक्षांनी एक पत्रक प्रसिद्ध करत कल्याण पूर्वेच्या प्रभाग क्रमांक १२ मधील अ, ब, क आणि ड पॅनलमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचा हा निर्णय सामाजिक न्याय, नागरी सुविधा, आरोग्य सेवा आणि जनकल्याणाच्या दृष्टीने योग्य ठरणार असल्याचा विश्वास या तिन्ही पक्षांनी व्यक्त केला आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) पक्षाच्या कल्याण शहर महिला आघाडीच्या अध्यक्षा निता कपिल मोरे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विशाल पावशे, बहुजन विकास आघाडीचे ठाणे जिल्हाध्यक्ष सुरेश पंडागळे यांनी स्वतंत्र जाहीर पत्रकांद्वारे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विक्रांत शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *