स्वाती घोसाळकर
मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराला आज गालबोट लागले. मुंबईत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराला प्रचारादरम्यान चाकूने भोसकले. वांद्रे परिसरात प्रचार सुरु असतानाच शिवसेना उमेदवाराच्या पोटात चाकू खुपसण्यात आला आहे. मुंबईतील प्रभाग क्रमांक ९२ मधील शिंदेंच्या शिवसेनेचे अधिकृत उमेदवार हाजी सालिन कुरेशी यांच्यावर हा चाकू हल्ला झाला आहे. 
बांद्रा येथील ज्ञानेश्वर नगर इथे हा हल्ला झाला आहे. प्रचार सुरु असताना अज्ञात व्यक्तींनी हा हल्ला केला आहे. या घटनेनंतर कार्यकर्त्यांनी दुचाकीवरून तात्काळ हाजी सालिम कुरेशी यांना रुग्णालयात नेले. तेथे त्यांनी दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर महात्मा गांधी रुग्णालयात ऊपचार सुरु आहे.
या घटनेमुळं वांद्रे परिसरामध्ये भीतीच्या आणि तणावाच्या वातावरण निर्माण झाला आहे. घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत हल्ला करणारा व्यक्ती कोण होता. हल्ला करण्याच्या मागे हेतू काय होता. यासंदर्भात पोलीस अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *