युवा कुस्तीपटू स्नेहाचे यश

मुंबई : मुंबई  शहर उपनगर जिल्हा तालीम संघ आयोजित मुंबई शहर उपनगर जिल्हास्तरीय १५,१७,२० वर्षाखालील‌ कुस्ती स्पर्धेत मिरा भाईंदर येथील श्री गणेश आखाड्यातील स्नेहा मल्लाने सुवर्ण पदकाची कमाई केली. या स्पर्धा‌ रेल्वे पोलिस वसाहत, घाटकोपर या ठिकाणी संपन्न झाल्या. स्नेहा मल्ला हिने २० वर्षाखालील वयोगटात ५० किलो वजनी गटात प्रथम क्रमांक पटकाविला .

स्नेहाची निवड आता २० वर्षाखालील राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धसाठी झाली आहे. तिने गतवर्षी  १९ वर्षाखालील शालेय कुस्ती स्पर्धेत मुंबई उपनगर जिल्ह्यातून प्रथम येण्याचा मान मिळविला. तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका – शारीरिक शिक्षण विभाग आयोजित कुस्ती स्पर्धेत देखील ४० किलो वजनीगटात प्रथम क्रमांक मिळविला. कुस्तीच्या सरावासाठी ती बोरिवली ते भाईंदर रोज प्रवास करते. तिला आखाड्याचे सर्वेसर्वा वसंतराव पाटील, कुस्ती प्रशिक्षक पै.वैभव माने यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *