हृदयातील झडपांच्या आजारावर रविवारी ठाण्यात व्याख्यान
ठाणे- डॉक्टर तुमच्या भेटीला हा कार्यक्रम रविवारी ११ जानेवारीस सकाळी १०.३० वा. घंटाळी सहयोग मंदिर हॉल ठाणे येथे होईल.यात हृदयातील झडपा व त्या संबंधीच्या आजारावर उपाय व उपचार यावर डॉ. दयानंद कुंबळा व डॉ. प्रतीक साने हे दोन्ही प्रसिध्द हृदयविकार तज्ज्ञ व्याख्यान देणार आहेत. व्याख्यानानंतर डाॅक्टर व प्रेक्षकांत प्रश्नोत्तरे होतील.
