केडीएमसी निवडणूकीसाठी सर्व महत्त्वाच्या ठीकाणी सी.सी.टी.व्ही.ची करडी नजर

कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ साठी निवडणूक निर्णय अधिकरी यांचे कार्यालयात निवडणूक प्रक्रिया सुरळीत व सुरक्षित होणे कामी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या ९ ठिकाणी असलेल्या कार्यालयात एकूण १३४ नग सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविण्यात आले असून त्यांच्या मॉनिटरींग कक्ष प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात ठेवण्यात आलेले आहेत.

लालचौकी येथे मध्यवर्ती स्ट्रॉंग रूम व निवडणूक निर्णय अधिकारी निहाय एकूण ९ स्ट्रॉंग रुम अशा एकूण १० स्ट्रॉंग रुमच्या ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीने १६५ नग सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविण्यात आले असून त्यांच्या मॉनिटर कक्ष प्रत्येक स्ट्रॉंग रुमच्या बाहेर ठेवण्यात आले आहेत, पोलीस विभागामार्फत त्यावर निगराणी करण्यात येते. तसेच टपाली मतदान प्रक्रिये करिता परिमंडळ – १  कार्यालय येथे तयार करण्यात आलेल्या स्ट्रॉग रूम करिता ७ सी. सी. टी. व्ही. कॅमेऱ्यांची व्यवस्था करण्यात आली असून त्यांच्या मॉनिटर कक्ष परिमंडळ १ कार्यालयात ठेवण्यात आले  आहेत, त्याची निगराणी देखील  पोलीस विभागाकडून  ठेवण्यात येते.

तसेच सार्वत्रिक निवडणूक अंतर्गत निवडणूक निर्णय अधिकारी निहाय मतदान साहित्य वाटप केंद्र, जमा केंद्र व मतमोजणी केंद्र येथे सुद्धा सीसीटीव्ही कॅमेऱ्याची व्यवस्था करण्यात येणार असून तेथील कामकाजावर सीसीटीव्ही ची करडी नजर राहणार आहे.

तसेच सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ अंतर्गत निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय, स्ट्रॉग रूम, ट्रेनिंग सेंटर, मतदान केंद्र, मतदान साहित्य वाटप व जमा केंद्र, मतमोजणी केंद्र येथे विद्युत विभागाकडून विद्युत संच मांडणी, विद्युत पुरवठा खंडित झाल्यावर पर्यायी वीज पुरवठा कामी जनरेटर व्यवस्थेचेसुद्धा नियोजन केल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त शहर अभियंता (विद्युत व यांत्रिकी ) प्रशांत भागवत यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *