म्हसा यात्रेत चोरीची केवळ यादीच, पाकिटमारांचा तपास कधी?
वयोवृद्ध आजीचे गाठोडे मारल्याने प्रवासासाठी भीक मागण्याची वेळ
राजीव चंदने
मुरबाड : संपूर्ण महाराष्ट्रासह सुप्रसिद्ध असलेल्या म्हसा यात्रेत भाविकांचे सूरक्षिततेसाठी हजारो पोलिस बळ असताना चोरीच्या घटना मध्ये वाढ होत असुन देवकाबाई पांडुरंग आघाणे.या आजीचे पाकिट मारांनी गाठोडे लंपास केल्याने वयोवृद्ध आजीला घर गाठण्यासाठी प्रवास भाडे नसल्याने भीक मागावी लागल्याचा संतापजनक प्रकार घडल्याने पोलिसांचे सुरक्षितते बद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे.
गुरांच्या बाजारासाठी तसेच शेतीचे अवजारासाठी सुप्रसिद्ध असलेल्या म्हसा यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे घोंगडी आणि ब्लाकेंट. तसेच ईतर संसारोपयोगी वस्तू मिळत असल्याने भक्तगण आपल्या कुटुबिंयासह लाखोचे संख्येने येत असतात पंधरा दिवस चालणाऱ्या या यात्रेत नागरिकांचे मनोरंजन व्हावे यासाठी महाराष्ट्रातील तमाशाचे फड आपली हजेरी लावतात.परंतु त्यांना पोलिसांचे संरक्षण मिळत नसल्याने या तमाशा कलावंतानी पारंपारिक यात्रेकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे भाविक आकाश पाळणे,मौत का कुॅआ, इतर मनोरंजनाचे खेळावर आपली करमणुक करतात आणि घरी परतत असताना शेतीची औजारे व संसारोपयोगी वस्तू खरेदी करण्यासाठी लगबग करतात.या ठिकाणी ग्राहक बनुन तेथे गर्दी करणारे लुटारू जास्त असतात.आपण खरेदी केलेल्या वस्तूचे पैसे देताना हे पाकिटमार त्यांची टेहाळणी करुन अलगद गळ्यातील दागिने मोबाईल,पैसे लंपास करुन पळ काढतात.पोलिसाकडुन सतत चोरांपासून सावधान राहण्याची उद्घोषणा होत असली तरी चोरीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसते.आपले लंपास झालेले पैसे , दागिने तसेच इतर मौल्यवान वस्तूची तक्रार देण्यासाठी पिडित पोलिस ठाण्यात धाव घेत असुन त्यांची पोलिस ठाण्यात फक्त नावे घेतली जातात.अशा प्रमाणे गवाळी येथिल सुमारे सत्तर वर्षाची आजी देवकाबाई पांडुरंग आघाणे,दर्शनासाठी आली असता तिचे गाठोडे चोरट्यांनी लंपास केल्याने घरी जायचे कसे या विवंचनेत ती सापडली असता घरी जाण्यासाठी तिच्याकडे पैसे नसल्याने भीक मागून घर गाठावे लागल्याने पोलिसांचे सुरक्षिततेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.
