सारा तेंडुलकरच्या हस्ते खारघरमध्ये पीएनजी लाईफ स्टाईलचे दिमाखदार उद्घाटन
कल्याण: हाऊस ऑफ पीएनजी अंतर्गत आधुनिक आणि वजनाने हलक्या दागिन्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या ‘लाइटस्टाईल बाय पीएनजी ज्वेलर्स’ने नवी मुंबईतील खारघर येथे आपल्या नवीन स्वतंत्र स्टोअरचे उद्घाटन करून विस्तार प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. फॅशन आयकॉन सारा तेंडुलकर हिच्या हस्ते या भव्य दालनाचे उद्घाटन करण्यात आले.
उद्घाटन सोहळ्याप्रसंगी बोलताना सारा तेंडुलकर म्हणाली की, लाइटस्टाईल ब्रँड आजच्या काळातील महिलांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसे आणि दैनंदिन वापरासाठी सोयीस्कर ठरतील असे दागिने उपलब्ध करून देतो. फाइन ज्वेलरी अधिक सहज आणि उपयुक्त बनवणाऱ्या या ब्रँडच्या प्रवासाशी जोडले गेल्याबद्दल तिने आनंद व्यक्त केला. तसेच, खारघर हे वेगाने विकसित होणारे क्षेत्र असून येथील आधुनिक जीवनशैली जपणाऱ्या ग्राहकांशी थेट संवाद साधण्याच्या उद्देशाने हे स्टोअर सुरू केल्याचे लाइटस्टाईलचे मार्केटिंग व ई-कॉमर्स हेड हेमंत चव्हाण यांनी स्पष्ट केले.
या विशेष प्रसंगी ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर जाहीर करण्यात आली आहे. लाइटस्टाईल ज्वेलरीच्या मेकिंग चार्जेसवर ५० टक्क्यांपर्यंत सूट दिली जात असून, ही सवलत ४ फेब्रुवारी २०२६ पर्यंत वैध असणार आहे. परंपरेला आधुनिक सौंदर्याची जोड देत, किफायतशीर किमतीत उच्च दर्जाचे दागिने उपलब्ध करून देणे हा यामागील मुख्य हेतू आहे.
