मुंबईच्या सर जमशेठजी जीजीभॉय कला महाविद्यालयाचे चित्रकलेतील सुवर्ण पदक सन्मानित ज्येष्ठ चित्रकार रमेश कुर्जेकर यांचा अभीष्टचिंतन सोहळा हडपसर, पुणे येथील ‘बा विठ्ठला’ या मराठमोळ्या उपहारगृहाच्या सभागृहात ‘सांजवेळ’ संस्थेने मोठ्या उत्साहात साजरा केला. यावेळी आबा सातव, सुधाकर गुलदगड, प्रा. बाळासाहेब कापसे, माऊली तुपे, रामराव गोगावले सामाजिक कार्यकर्ते, जयसिंग खेंडके, प्रा. पी. डी. राऊत, यशवंत कानडे यांनी शाल श्रीफळ आणि गांधी टोपी देऊन भाई रमेश कुर्जेकर यांचा सन्मान केला.
