खान्देश सामाजिक विकास संस्थेचा भाजपला जाहीर पाठिंबा
पनवेल (प्रतिनिधी) खान्देश सामाजिक विकास संस्था रायगडने पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी भाजप उमेदवारांना आपला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. त्यांनी या पाठिंब्याचे पत्र आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे सुपूर्द केले आहे.  पनवेल, नवीन पनवेल, खांदा कॉलनी, कामोठे, कळंबोली, खारघर येथील सर्व मंडळे भाजपच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा देत असून सर्व उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी पाठिंबा पत्राद्वारे आश्वासित केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *