मराठा समाजाचा वधु-वर  मेळावा
आज सानपाडा येथे करण्यात आले आहे आयोजन
मुंबई, दि. (प्रतिनिधी ) : नवी मुंबईत सानपाडा येथे मराठा विकास प्रतिष्ठानच्या वतीने   १०  जानेवारी  २०२६ रोजी  दुपारी २ ते  सायंकाळी ७ या दरम्यान केमिस्ट भवन, सेक्टर ८,  सानपाडा, नवी मुंबई येथे  १६ वा मराठा समाज वधू-वर परिचय मेळावा आयोजित  करण्यात आला आहे.  मराठा विकास प्रतिष्ठान  ही संस्था २००६  पासून सांस्कृतिक, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात गेली २०  वर्षे सातत्याने कार्यरत आहे. सध्याच्या काळात समाजामध्ये विवाहासाठी योग्य वधू-वर जुळवणे ही एक गंभीर सामाजिक समस्या निर्माण झाली आहे. ही गरज लक्षात घेऊन संस्थेमार्फत वधू-वर सूचक केंद्र चालविले जाते. या उपक्रमाच्या माध्यमातून आतापर्यंत अनेक विवाह जुळविण्यात  संस्थेला यश आले आहे, अशी माहिती मारुती विश्वासराव यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *