मुख्य निवडणूक निरीक्षक निलेश गोरख सागर यांनी घेतला केडीएमसी निवडणूकीचा आढावा
कल्याण: कल्याण-डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६साठी नियुक्त करण्यात आलेले मुख्य निवडणूक निरीक्षक निलेश गोरख सागर यांनी महापालिका सार्वत्रिक निवडणूकीचा सर्वंकष आढावा घेतला.
यावेळी निवडणूक निरीक्षक पद्माकर रोकडे, महापालिकेचे निवडणूक अधिकारी तथा आयुक्त अभिनव गोयल, अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे, कल्याण परिमंडळ-३ चे पोलीस उपआयुक्त अतुल झेंडे, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूकीसाठी नियुक्त सर्व नोडल ऑफिसर तसेच निवडणूकीसाठी प्रभागनिहाय नियुक्त केलेले निवडणूक निर्णय अधिकारी, पोलीस अधिकारी वर्ग, आरटीओ अधिकारी तसेच इतर अधिकारी वर्ग उपस्थित होता.
मुख्य निवडणूक निरीक्ष‍कांनी महापालिकेतर्फे निवडणूकीकामी सुरु असलेल्या तयारीबाबत चर्चा केली. VOTERS TURNOUT च्या नोंदी व्यवस्थित घ्याव्यात. कर्मचाऱ्यांच्या मनात कुठलाही संभ्रम राहू नये, अशा प्रकारे प्रशिक्षणाचे आयोजन, नियोजन करावे. REPORTING अचूक असावे. तसेच DISPACTH व रिसीव्हींग चे काम कुशलतेने करण्यात यावे, असे संबोधत सर्व उपस्थित अधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी यांस मार्गदर्शन केले.
या बैठकीत महापालिका निवडणूक अधिकारी तथा आयुक्त अभिनव गोयल यांनी निवडणूकीच्या तयारीची माहिती दिली. त्याचप्रमाणे निवडणूकीसंदर्भातील तयारीचे पीपीटी द्वारे सादरीकरण यावेळी करण्यात आले. कल्याण परिमंडळ-३ चे पोलीस उपआयुक्त अतुल झेंडे यांनी पोलीस विभागामार्फत सुरु असलेल्या आणि करण्यात आलेल्या प्रत्यक्ष निवडणूकीपूर्वी, मतदान व मतमोजणी दिवशी पोलीस विभागामार्फत करण्यात आलेल्या तयारीची/बंदोबस्ताची माहिती विषद केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *